सोलापूर – पूर्वीचे भांडण तसेच पैशाच्या वादातून एका तरुणाला दुचाकीला दोरीने बांधून फरफटत नेऊन चाकूने मारहाण करीत खुनाचा प्रयत्न केल्याची घटना केडगाव (ता.करमाळा) येथे गुरुवारी (ता. 1) दुपारच्या सुमारास घडली. Attempted murder in Karmala by tying a young man to a bike; A crime against three
या प्रकरणात करमाळ्याच्या पोलिसांनी रेवणनाथ अंकुश मारकड (रा.चिखलठाण ता.करमाळा) याच्यासह तिघा विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
अभिजीत दासू करे (वय २० रा.कोंडेज ता. करमाळा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अभिजीत करे आणि आरोपी मारकड यांच्यात व्यवसायातील पैशाच्या वाद तसेच पूर्वीचे भांडण होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास मारकड याने अभिजीतला केडगाव येथील कॅम्प रस्त्यावर बोलवले होते. त्याप्रमाणे आभिजीत घटना स्थळी आला होता.
तेव्हा मारकड याच्यासह तिघांनी याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला दुचाकीला दोरीन बांधून फरपटत उसाच्या शेतात नेले. आणि त्याला चाकूने वार करून गंभीर जखमी करून पसार झाले. अशी नोंद करमाळा पोलिसात झाली. सहाय्यक निरीक्षक जगताप पुढील तपास करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ बाळे येथे पहाटे अपघात; दुचाकी वरील तरुण ठार
सोलापूर – गावातील यात्रेसाठी पुण्याहून दुचाकीवरून निघालेल्या तरुणाचा अनोळखी वाहनाच्या धडकेन अंत झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (ता.1) पहाटेच्या सुमारास पुणे महामार्गावरील बाळे येथे घडला.
विजय खाजप्पा निलंगे (वय २० रा. नागणसूर ता.अक्कलकोट) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. संजीवकुमार बसलिंगप्पा मुंदीनकेरी (वय३० रा. नागणसूर) हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
निलंगे आणि मुंदनकेरी हे दोघे नागणसुरचे राहणारे असून ते पुण्यात एका कंपनीत कामाला होते. नागणसूर येथे गावची यात्रा असल्याने दोघेही दुचाकीवरून काल रात्री पुण्याहून निघाले होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास बाळे परिसरातील शिवाजीनगर येथे अनोळखी वाहनाच्या धडकेने दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यापैकी विजय निलंगे हा उपचारापूर्वी मरण पावला. या अपघाताची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली. हवालदार परीट पुढील तपास करीत आहेत.