अकलूज : जुळ्या बहिणींनी केले एकाच मुलाशी… लग्न मुंबईतल्या कांदिवलीतील दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न केले आहे. पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणी आयटी इंजिनिअर असून एकाच कंपनीत काम करतात. या दोघींचे नातेवाईक सोलापुरात अकलूजमधील आहेत. A unique marriage took place in Solapur; Malshiras Akluj married twin sisters in the same mandap
या जुळ्या दोघींच्या सवयीसुद्धा एकसारख्या आहेत. इतकेच काय तर एकीला त्रास झाल्यास तो दुसरीलासुद्धा जाणवतो. त्यांनी विवाह केलेला तरुण अतुल हा अंधेरीत राहतो. दोघींपैकी एकीचे अतुलवर प्रेम जडले. पण दोघी वेगळ्या राहू शकत नसल्याने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
सध्या मुलींच्या तुलनेत मुलांचा जन्मदर कमी झाल्यामुळे अनेक मुलांना विवाहासाठी मुली मिळत नाहीत. एखाद्या मुलाला चांगले घर असेल, जमीन -जुमला असेल, नोकरी असेल तरी सुद्धा लग्न जमविण्यासाठी अनेक खटपटी कराव्या लागतात. परंतु माळशिरस तालुक्यातील अकलूज वेळापूर रस्त्यावर असलेल्या नामांकित हॉटेल गलांडेमध्ये मात्र 2 डिसेंबर रोजी निसर्गरम्य वातावरणात एकाच मंडपात एका तरुणाने चक्क दोन जुळ्या बहिणीशी विवाह केल्याची ही घटना घडली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या लग्नासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
दरम्यान या अनोख्या विवाहाचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. एकाच वेळी एकाच मंडपात एका नवरदेवाने दोन वधूशी विवाह केल्याचे आजवर कधी पाहायला किंवा ऐकायला मिळाले नव्हते. विशेष म्हणजे, त्या दोन वधू जुळ्या बहिणी आहेत. या विवाहाची पत्रिका व त्या संदर्भातोल फोटो सध्या सोशल मोडियावर व्हायरल होत आहेत.
अकलूज – वेळापूर रस्त्यावरील अकलूज आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या हॉटेल गलांडे येथे मंगळवारी ( 2 डिसेंबर) दुपारी साडेबारा वाजता हा अनोखा व अविस्मरणीय विवाह सोहळा अगदी थाटात पार पडला. वधू पिंकी आणि वर अतुल हे दोन्ही कुटुंब मुंबईतील आहेत. मुलगा अंधेरीचा तर मुलगी कांदिवली येथील आहेत. त्यांचे नातेवाईक माळशिरस तालुक्यातील आहेत.
या अनोख्या विवाहाची निमंत्रण पत्रिका देखील छापण्यात आली होती. त्याचे हळदी व विवाह समारंभाचे फोटोही सोशल मोडियावर व्हायरल होत आहेत. एकीकडे अनेक मुलांना विवाहासाठी एक मुलगी मिळत नसताना या पठ्ठ्याने मात्र एकाच वेळी दोन मुलीबरोबर लग्न केल्यामुळे हा लग्न सोहळा माळशिरस तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.