□ हिवाळी अधिवेशनात मागणी मान्य न झाल्यास 28 डिसेंबरला काढणार मूक मोर्चा
सोलापूर : होटगी रोड रोडवरील नागरी विमान सेवा सुरू करा या मागणीसाठी सोलापूर विकासाच्या वतीने मागील महिनाभरापासून उपोषण सुरू आहे, दरम्यान आज मंगळवारी (ता. 6 डिसेंबर) पासून उपोषणास स्थगित देण्यात आले असल्याचे आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. Chimney Removal Movement of Solapur Vikas Manch suspended, Mukmorcha Siddeshwar Sugar Factory on December 28
28 डिसेंबर पर्यंत यावर निर्णय न झाल्यास मेकॅनिक चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मूक मोर्चा काढू, असा इशाराही सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा यांनी पत्रकार परिषदेत दिला. होटगी रोडवरील विमानसेवा तात्काळ सुरू करा या मागणीसाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनम गेट समोर मागील एक महिनाभरापासून उपोषण सुरू ठेवले.
दरम्यान या उपोषणास महाराष्ट्रासह सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नामांकित आणि प्रतिष्ठित तब्बल 198 संस्था संघटना आणि व्यक्ती यांचा सक्रिय जाहीर पाठिंबा प्राप्त झाला. प्रत्यक्ष उपस्थित आता ऑनलाईन पद्धतीने देश-विदेशातून सुमारे 12 हजार 500 हून अधिक सोलापूरकरांनी सह्यांच्या मोहिमेस आपल्याला सक्रिय पाठिंबा दर्शविल्याचे सांगितले.
दरम्यान केंद्र सरकार, महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशनात या महिन्यापासून सुरू होणार आहे, होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासंबंधी या दोन्ही ठिकाणच्या अधिवेशनात कोणतेही हालचाल न झाल्यास बुधवार, 28 डिसेंबर रोजी सोलापुरातील नामांकित आणि प्रतिष्ठित संस्था संघटना आणि व्यक्ती यांच्यासह भव्य मूक मोर्चा काढणार आहोत.
एकंदरीत सरासरी विचार करून सोलापूर विकास मंचच्या सदस्याने सदर चक्री उपोषण काही काळासाठी स्थगिती करण्याचा निर्णय घेतला आहे. बोरामणी येथील विमानतळही झाले पाहिजे, मात्र तत्पूर्वी होटगी रोड विमानतळावरून सेवा सुरू झाली पाहिजे, अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.
या पत्रकार परिषदेस मिलिंद भोसले, योगिनी गुर्जर, गणेश पेनगोंडा, ऍडव्होकेट खतीब वकील, विजय जाधव, प्रसन्न नाझरे, दत्तात्रय अंबुरे, सुहास भोसले, इकबाल होंडेकरी, मनोज क्षीरसागर, दत्तात्रय सिद्धगणेश, पी. वाय. काकडे आदी उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते सोलापूरच्या कीर्तीचा सम्मान
सोलापूर : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते विश्वविक्रमावर नाव कोरणा-या सोलापूरच्या कु. किर्ती नंदकिशोर भराडिया (वय 16) हिचा मुंबईत सन्मान झाला.
कीर्तीने मुंबई येथील अरबी समुद्रात वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडिया हे 38 किलोमीटरचे अंतर न थांबता 7 तास 22 मिनिटात पोहून विश्वविक्रम प्रस्थापित केले. तिच्या या साहासाबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी किर्तीला “मातोश्री” येथील निवासस्थानी बोलावून किर्तीचा सम्मान केला.
कीर्तीच्या विश्वविक्रमाची माहिती घेवून प्रशंसा केली. या पुढे श्रीलंका ते भारत (रामेश्वर) हे अंतर पोहून विश्वविक्रम करण्याचा ध्येय आहे, असे सांगितल्यावर किर्तीच्या साहसाचे त्यांनी कौतुक केले. पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यासोबत किर्तीचे प्रशिक्षक शेटे सरांचे सुद्धा कौतुक केले.
याप्रसंगी संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, पूजा खंदारे, दीपिका सामल, प्रशिक्षक शेटे सर, नंदकिशोर भराडिया, चित्रा भराडिया, अविनाश भराडिया उपस्थित होते.