● सोलापूर विकास मंचचे आंदोलन स्थगित आता सोलापूर विचार मंच मैदानात
सोलापूर : होटगी रोड रोडवरील नागरी विमान सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी चालू असलेले दीर्घकालीन आंदोलन सोलापूर विकास मंचने स्थगित केले. आता याच मागणीसाठी सोलापूर विचार मंच मैदानात उतरले असून त्यांनी हलगीनाद आंदोलनाचा इशारा दिला आहे. Halginad agitation Solapur Vikas Manch Solapur Vichar Manch in front of Solapur Municipal Corporation from Monday for air service
सोलापूर विकास मंचने कोणतेही ठोस आश्वासन न घेता हे उपोषण बंद केले असा आरोप करत महापालिका आयुक्तांनी चिमणी बाबत निर्णय दिला नाही. त्यामुळे 12 डिसेंबर पर्यंत महापालिका आयुक्तांनी याबाबत निकाल द्यावा आणि सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून विमान सेवा त्वरित सुरू करावी याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर विचार मंचच्या वतीने सोमवार, 12 डिसेंबरपासून दररोज सकाळी 11 ते 12 या वेळेत सोलापूर महापालिकेच्या प्रवेश द्वारासमोर दररोज हलगीनाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर विचार मंचचे सदस्य संजय थोबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याने महापालिकेची परवानगी न घेता तसेच डीजीसीए यांची एनओसी न घेता आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे 92 मीटर उंचीची वीज निर्मितीची चिमणी उभारली आहे. आजच्या तारखेपर्यंत या प्रकल्पाला एनव्हायरनमेंटल क्लियरन्सचे प्रमाणपत्र नाही. जिल्हा न्यायालय, राष्ट्रीय हरित लवाद, मुंबई हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांनी देखील ही चिमणी बेकायदेशीर असल्यामुळे आजवर कारखान्याचे सर्व दावे फेटाळले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्तांनी कारखान्याची सुनावणी घेऊन त्वरित निकाल देण्याबाबतचा आदेश दिला आहे. तरीही याबाबत निकाल दिला जात नाही.
बेकायदेशीर बांधलेल्या चिमणीला डीजीसीएकडून एनओसी मिळू शकत नाही. त्यामुळे चिमणी पाडल्याशिवाय होटगी रोडवरील विमानसेवा सुरू होणार नाही आणि गेल्या दहा वर्षापासून आपण बोरामणी विमानतळाचे स्वप्न बघतोय आज पर्यंत तिथे काहीच झाले नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये होटगी रोडवरून त्वरित विमान सेवा सुरू होऊ शकते मात्र याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे,असा आरोप सोलापूर विचार मंचने केला.
धर्मराज काडादी यांनी शेतकऱ्यांची, जनतेची दिशाभुल करणं थांबवावं ते केवळ साखरकारखान्यात चुकीचे वागलेत असं नाही तर ते ट्रस्टी असलेल्या, मालक असलेल्या अनेक ठिकाणी चुकीचे निर्णय घेत असल्याचाही आरोप केला.
या पत्रकार परिषदेत डॉक्टर संदीप आडकी, श्रीशैल वाले , नागनाथ मेंगाणे, प्रभुनंदन भुतडा, विठ्ठलराव वठारे आदी उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》सोलापूर विकास मंचचे चिमणी हटाव आंदोलन केले स्थगित, 28 डिसेंबरला मूकमोर्चा
सोलापूर : होटगी रोड रोडवरील नागरी विमान सेवा सुरू करा या मागणीसाठी सोलापूर विकासाच्या वतीने मागील महिनाभरापासून उपोषण सुरू आहे, दरम्यान आज मंगळवारी (ता. 6 डिसेंबर) पासून उपोषणास स्थगित देण्यात आले असल्याचे आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.
28 डिसेंबर पर्यंत यावर निर्णय न झाल्यास मेकॅनिक चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मूक मोर्चा काढू, असा इशाराही सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा यांनी पत्रकार परिषदेत दिला. होटगी रोडवरील विमानसेवा तात्काळ सुरू करा या मागणीसाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनम गेट समोर मागील एक महिनाभरापासून उपोषण सुरू ठेवले.
दरम्यान या उपोषणास महाराष्ट्रासह सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नामांकित आणि प्रतिष्ठित तब्बल 198 संस्था संघटना आणि व्यक्ती यांचा सक्रिय जाहीर पाठिंबा प्राप्त झाला. प्रत्यक्ष उपस्थित आता ऑनलाईन पद्धतीने देश-विदेशातून सुमारे 12 हजार 500 हून अधिक सोलापूरकरांनी सह्यांच्या मोहिमेस आपल्याला सक्रिय पाठिंबा दर्शविल्याचे सांगितले.
दरम्यान केंद्र सरकार, महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशनात या महिन्यापासून सुरू होणार आहे, होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासंबंधी या दोन्ही ठिकाणच्या अधिवेशनात कोणतेही हालचाल न झाल्यास बुधवार, 28 डिसेंबर रोजी सोलापुरातील नामांकित आणि प्रतिष्ठित संस्था संघटना आणि व्यक्ती यांच्यासह भव्य मूक मोर्चा काढणार आहोत.
एकंदरीत सरासरी विचार करून सोलापूर विकास मंचच्या सदस्याने सदर चक्री उपोषण काही काळासाठी स्थगिती करण्याचा निर्णय घेतला आहे. बोरामणी येथील विमानतळही झाले पाहिजे, मात्र तत्पूर्वी होटगी रोड विमानतळावरून सेवा सुरू झाली पाहिजे, अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.
या पत्रकार परिषदेस मिलिंद भोसले, योगिनी गुर्जर, गणेश पेनगोंडा, ऍडव्होकेट खतीब वकील, विजय जाधव, प्रसन्न नाझरे, दत्तात्रय अंबुरे, सुहास भोसले, इकबाल होंडेकरी, मनोज क्षीरसागर, दत्तात्रय सिद्धगणेश, पी. वाय. काकडे आदी उपस्थित होते.