नवी दिल्ली : दिल्ली महापालिकेतील भाजपच्या 15 वर्षांच्या सत्तेचा आज शेवट झाला आहे. तीन महापालिकांची एक महापालिका झाल्यानंतर घेण्यात आलेल्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने 134 जागा जिंकत येथे सत्ता मिळवली आहे. BJP out of power in Delhi Municipal Corporation; Aam Aadmi Party won majority Arvind Kejriwal
आपने झेंडा रोवला असून आप ने २५० पैकी १३४ जागा जिंकल्या, भाजपने त्याखालोखाल १०३ जागा जिंकल्या असून कॉंग्रेसने १० जागा जिंकल्या आहेत. 2007 पासून महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपला 104 जागा जिंकण्यात यश आले आहे. एकूण 250 प्रभागासाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. बहुमत मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. दिल्लीमध्ये आपच्या कार्यालयाबाहेर सेलिब्रेशन सुरु आहे. तर मुंबईतही आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. 250 जागांपैकी 126 जागा जिंकून ‘आप’ने बहुमताचा आकडा पार केला आहे आणि आणखी 7 जागांवर त्यांनी आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपने 97 जागा जिंकल्या आहेत. अजूनही मतमोजणी सुरु आहे. काँग्रेसने 7 जागांवर विजय मिळवला असून 3 जागांवर ते आघाडीवर आहेत. तर 3 अपक्ष उमेदवारांनीही निवडणूक जिंकली आहे. एक्झिट पोल या ठिकाणी खरे ठरले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दिल्ली महापालिका निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला 250 प्रभागातील 134 जागा जिंकण्यात यश आले आहे. तर भाजपने 104 जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेसला 9 आणि तर अपक्षांना 3 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान या निकालावर केजरीवाल यांनी आनंद व्यक्त केला असून जनतेचे आभार मानले आहेत.
दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीसाठी 13638 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. या निवडणुकीत सुमारे 50 टक्के मतदान झालं होतं. यामध्ये सर्वाधिक मतदान 65.72 टक्के प्रभाग क्रमांक 5 बख्तावरपूर इथे तर सर्वात कमी 33.74 टक्के मतदान प्रभाग क्रमांक 145 अँड्र्यूज गंज इथे झालं होतं. 2017 च्या दिल्ली महापालिका निवडणुकी भाजपने 270 पैकी 181 प्रभाग जिंकले होते. या निवडणुकीत आपने 48 तर काँग्रेसला 27 जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकी 53 टक्के मतदान झालं होतं.
□ ‘आप’च्या ट्रान्सजेंडर उमेदवाराचा विजय
दिल्ली महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी पार पडली असून अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आम आदमी पक्षाच्या ट्रान्सजेंडर उमेदवार बॉबी किन्नर सुलतानपुरी ए वॉर्ड-43 मधून विजयी झाल्या आहेत, बॉबी किन्नर यांनी काँग्रेस उमेदवार वरुण ढाका यांचा 6,714 मतांनी पराभव केला. दिल्ली महानगरपालिकेत पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर समुदायाचा सदस्य एखाद्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.