पुणे : फुले, आंबेडकर आणि कर्मवीरांबद्दल केलेल्या विधानामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरीत शाईफेक करण्यात आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलीसांनी शाईफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. Anger across the state: In Pune, Chandrakant Patal was hurled at; Apologies expressed
Bommai effigy burnt
पुण्यातील चिंचवड गावामध्ये चंद्रकांत पाटील हे एका कार्यकर्त्याच्या घरी आले असता त्यांच्यावर हा शाई फेकण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षा व्यवस्थेत पोलीस बंदोबस्त चोख असूनही काही लोकांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केली आहे. मी चळवळीतला माणूस आहे, मी कुणाला घाबरत नाही, असे पाटलांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ही झुंडशाही सहन करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी सर्व कार्यक्रम करणार आहे. मी कुणाला घाबरत नाही. अशा प्रकारे पराचा कावळा करणं, दिलगिरी व्यक्त केली असतानाही असा भ्याडपणे हल्ला करणं चुकीचं आहे. हिंमत असेल तर समोरुन या. सगळं पोलिस डिपार्टमेंट बाजूला करतो, असं ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक करण्याचा भ्याड हल्ला झाला आहे. याप्रकरणी घरात घुसून उत्तर देऊ, असं भाजप नेते राम कदम यांनी म्हटलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत सडकून टीका केली होती. या वादानंतर चंद्रकांत पाटलांनी स्पष्टीकरण देत आपल्या वक्तव्यात काहीही आक्षेपार्ह नसून भीकचा अर्थ आजच्या काळात देणगी, वर्गणी आणि सीएसआर असा होतो, अशी भूमिका मांडली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ व्यक्त केली दिलगिरी
कालपासून पाटील यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की, भीक म्हणजे काय तर आपण महापुरुषांच्या जयंतीसाठी किंवा वेगवेगळ्या उत्साहाच्या वेळी वर्गणी जमा करतो. त्यामुळे या भीक शब्दाने जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे. मी एवढ्या छोट्या मनाचा माणूस नाही. माझ्या रक्ता-रक्तात आंबेडकर, महात्मा फुले हे आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेकरांच्याबद्दल कोणाच्या मनात गैरसमज निर्माण झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करण्यास माझी काहीही हरकत नाही, असं पाटील म्हणाले.
पैठणच्या संत पिठाच्या कार्यक्रमात बोलतांना, शाळा चालू करण्यासाठी फुले- आंबेडकरांनी भीक मागितली असल्याचे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
त्यांच्या याच वक्तव्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता, तर अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आले. त्यामुळे अखेर चंद्रकांत पाटील यांनी फुले-आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या विधानामुळे कोणाचं मन दुखावले गेले असल्यास मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे पाटील म्हणाले. तर आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा देखील पाटील म्हणाले.
● चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर राज्यभर संताप
– औरंगाबादमध्ये वंचितच्या वतीने निषेध
– धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी तक्रार अर्ज
– सोलापुरात आंबेडकरी संघटना आक्रमक, जाळला पुतळा
– नंदुरबारमध्ये निदर्शने.
– नांदेडमध्ये प्रतिकात्मक पुतळ्याचा अंत्यविधी
– अमरावतीत जाळले पोस्टर
》 सोलापुरात कोश्यारी, बोम्मई यांच्या विरोधात आंदोलन
सोलापूर – महाराष्ट्राविरोधात भुमिका घेणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या फोटोला चप्पलमार आंदोलन आज एकनाथ शिंदे समर्थक बाळासाहेबांची शिवसेना वतीनं करण्यात आलं.
दरम्यान आज बहुजन समाज पार्टीच्यावतीनं डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात घोषणाबाजी आणि आंदोलन झालं. तर डेमोक्रॉटीक पक्ष, भीम आर्मी वतीनं डॉ. आंबेडकर चौकात डॉ. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधात केली जाणारी चुकीची वक्तव्य सहन केली जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.