● फडावरची लावणी रुपेरी पडद्यावर केली लोकप्रिय
मुंबई : लावणी सम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. 60 वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. सुलोचना चव्हाण यांचा भारत सरकारने पद्मश्री देऊन सन्मान केला होता. Padmashri Lavani empress Sulochana Chavan passed away Maharashtra
महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावली होती. काही शस्त्रक्रिया व वृद्धत्व काळात आलेले आजारपणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज शनिवार, 10 डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी 12 च्या सुमारास मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. काही दिवसांपूर्वी सुलोचना चव्हाण यांचं कमरेचं हाड मोडलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
त्यांच्या पार्थिवावर आज मरीन लाईन्सच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुलोचना यांनी मराठीसह हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी याभाषांमध्येदेखील गाणी गायली आहेत.
लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा जन्म 17 मार्च 1933 मध्ये मुंबईत झाला होता. त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून गायला सुरुवात केली. त्यांच्या, मला म्हणत्यात पुण्याची मैना, लई लई लबाड दिसतोय गं, तुझ्या ऊसाला लागेल कोल्हा, पाडाला पिकलाय आंबा, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची, मल्हारी देव मल्हारी, गोरा चंद्र डागला, खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, पाखरू पिरतीचे लाजुन बसलंय उरी यासह अनेक लावण्या फेमस आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबियांना या दुखातून सावरण्याचे बळ मिळो. ओम शांती #Sulochanachavan #RIP pic.twitter.com/32rjQk3bjY
— Mayur Magan Daundkar (@mayur_daundkar_) December 10, 2022
साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. भारत सरकारने त्यांना सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज हरपला आहे. सोळावं वरीस धोक्याचं, उसाला लागलं कोल्हा, पाडाला पिकलाय आंबा, पावणा पुण्याचा आलाय गं, अशा शेकडो लावण्या त्यांनी अजरामर केल्या आहेत.
ठसकेबाज लावण्यांनी सुलोचना चव्हाण यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले होते. ‘रंगल्या रात्री’ या सिनेमासाठी त्यांनी पहिल्यांदा लावणी गायली होती. फडावरची लावणी त्यांनी रुपेरी पडद्यावर लोकप्रिय केली. लावणीच्या चपखल, फटकेबाज शब्दांना आपल्या सुरांच्या माध्यमातून ठसका देण्याचं काम त्यांनी केलं. सुलोचनाबाईंनी लावणीसह भावगीते आणि भक्तिगीतेदेखील गाऊन लोकसंगीताचे दालन समृद्ध केले होते.
लावणीचा बाज आणि त्याची लोकप्रियता सुलोचना यांच्यामुळे टिकून राहिली असल्याचं म्हटलं जातं. सुलोचना चव्हाण यांनी ‘माझे गाणे माझे जगणे’ हे आत्मचरित्र लिहिले असून लावणीच्या संदर्भातील अनेक आठवणी त्यात आहेत.
● अभिनेता मनोज वाजपेयींच्या आईचे निधन
अभिनेता मनोज वाजपेयी यांची आई गीता देवी यांचे गाजियाबाद येथील रुग्णालयात निधन झाले. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. गीता देवी सुमारे 20 दिवसांपासून अस्वस्थ होत्या आणि गुरूवारी (ता.8) सकाळी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मनोज वाजपेयींचे वडील आर. के. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बाजपेयी यांचे दिल्लीत निधन झाले होते.