मुंबई : क्रिकेटपटू रिषभ पंतचा भीषण कार अपघात झाला आहे. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीवरून घरी परत परत जाताना पंतची कार डिव्हायडरला धडकली आणि कारने पेट घेतला. भारतीय संघ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये श्रीलंकेविरुद्ध टी ट्वेन्टी आणि एकदिवसीय सामना खेळणार आहे. मात्र, या मालिकेतून पंतला वगळण्यात आले आहे. Cricketer Rishabh Pant’s terrible car accident, the car caught fire in Delhi
रिषभ पंतवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची दुखापत गंभीर आहे. त्यांच्यावर तातडीने ऑपरेशन करण्यात येणार आहे. रिषभचे काही फोटोही समोर आले आहेत. त्यामध्ये त्याच्या डोक्याला दुखापत दिसून येत आहे. या अपघातात ऋषभ पंतला मोठा मार लागला आहे. त्याच्या कपाळावर जबर मार लागला आहे. शिवाय ऋषभच्या पाय आणि पाठीलाही भीषण मार लागला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभला दिल्ली रोड येथील सक्षम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ऋषभची प्रकृती स्थिर असल्याचं सक्षम रुग्णालयाचे चेअरमन डॉय सुशील नागर यांनी सांगितलं. त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक देहात स्वप्न किशोर सिंह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेचा पंचनामा सुरू केला असून अधिक तपास सुरू आहे. रिषभची कार रेलिंगला धडकली, त्यानंतर कारने पेट घेतला. मोठ्या परिश्रमानंतर कार लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. त्याचवेळी अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिषभ पंतला दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
https://twitter.com/rahulpr041/status/1608662578703798273?t=mFNhUvUBOoDhkCvuKP0oMw&s=19
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन बॉर्डरनजीक रिषभच्या कारला अपघात झाला. यानंतर रिषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे. खानपूरचे आमदार उमेश कुमार यांनीदेखील त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात भेट दिली.
ऋषभ पंत दिल्लीहून घरी जात असताना हा भीषण अपघात झाला. ऋषभची कार रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथील एका वळणावर रेलिंगला धडकली. कार नारसन गावात आली असता कारचालकाचं गाडीवरील ताबा सुटला आणि रेलिंग तसेच खांबांना धडक देत कार पलटी झाली. ही धडक अत्यंत जोरदार होती. त्यामुळे कारला भीषण आग लागली. त्यामुळे बघता बघता कार जळून खाक झाली. या कारचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला. त्यामुळे हा अपघात किती भीषण होता हे दिसून येतं. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात आली.