नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन मोदी यांचे आज निधन झाले आहे. हिराबेन यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर येथे पोहोचले आहेत. मोदी यांनी आईच्या पार्थिवाला खांदा दिला आहे. त्याआधी गांधीनगर येथील निवासस्थानी पोहोचत मोदींनी आईचे अंत्यदर्शन घेतले. हिराबेन यांनी आज पहाटे साडेतीन वाजता अहमदाबाद येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. Modi pays tribute to mother’s body; Modi’s mother’s prediction came true Hiraben
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. ‘एक गौरवशाली शतक देवाच्या चरणी विराम.. आई मध्ये मला ते त्रिमूर्ती नेहमीच जाणवते, ज्यात एका तपस्वीचा प्रवास आहे, निस्वार्थी कर्मयोगी आणि मूल्यांसाठी वचनबद्ध जीवन आहे’, असे मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे आज सकाळी अहमदाबाद येथील रुग्णालयात वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. निधनाचे वृत्त कळताच नरेंद्र मोदी हे तात्काळ अहमदाबादमध्ये दाखल झाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई श्री हीरा बा यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. आईच्या मृत्यूने माणसाच्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण होते जी भरून काढणे अशक्य असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे आज निधन झाले. अहमदाबादच्या रुग्णालयात पहाटे साडेतीन वाजता हिराबेन यांनी अखेरचा श्वास घेतला. मोदी एक दिवस पंतप्रधान होणार, अशी भविष्यवाणी मोदी यांच्या आईने एकदा केली होती. ती भविष्यवाणी 2014 मध्ये खरी ठरली. 2002 मध्ये जेव्हा मोदी गुजरातच्या राजकारणात सक्रीय होते, त्याचवेळी हिराबेन यांना त्यांचा मुलगा देशाचा पंतप्रधान होणार, असे वाटत होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अपनी दिवंगत मां हीराबेन मोदी के पार्थिव शरीर को कंधा देते हुए । उनकी मां का आज 100 साल की उम्र में निधन हो गया है । #hiraben pic.twitter.com/E0KrjTUpzj
— Kumar Gaurav/कुमार गौरव (@kumarrgaurrav) December 30, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. हिराबेन मोदी यांचा जन्म 18 जून 1923 रोजी झाला होता. आईच्या शंभराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी गांधीनगरमधील आपल्या आईच्या घरी भेट दिली होती व त्यांचे पाद्यपूजन देखील केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांनी वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुले आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्यावर दुःख कोसळले आहे.
हीराबेन यांची तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. हीराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल यांचे प्रधान सचिव के. कैलासनाथन रुग्णालयात गेले होते. त्यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना भेटून हीराबेन यांच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. तसेच त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.
स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही अहमदाबादला आले होते. त्यांनी आपल्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच आईसोबत थोडावेळ घालवला होता. हीराबेन यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र वृद्धापकाळ आणि आजारपण यामुळे हीराबेन यांची प्रकृती अधिकच खालावली. उपचाराला साथ न दिल्याने अखेर त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. आईच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: गांधीनगर येथे येणार आहेत. मोदी अंत्यसंस्काराला येणार असल्याने गांधी नगरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सात भाऊ बहीण आहेत. सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, बहीण वासंतीबेन, पंकजभाई मोदी आदी त्यांच्या भाऊ आणि बहिणींची नावे आहेत. त्यात मोदी तिसऱ्या क्रमांकाचे आहेत.
मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी अहमदाबादमध्ये किराणा दुकान चालवतात. मोदींचे मोठे बंधू सोमभाई आरोग्य विभागात कामाला होते, आता ते निवृत्त झाले आहेत. ते आता अहमदाबादेत एक वृद्धाश्रम चालवतात. तसेच सामाजिक कार्यात व्यस्त असतात. अमरुतभाई यांनी एका खासगी कंपनीत फिटर म्हणून काम केलं आहे. आता तेही निवृत्त झालेले आहेत. मोदी यांचे सर्वात लहान बंधू पंकज मोदी हे गुजरातच्या माहिती विभागात कामाला होते. तेही निवृत्त झाले आहेत. हीराबेन पंकजभाईंसोबतच गांधीनगरला राहत होत्या.