पंढरपूर : येथील अरिहंत पब्लिक स्कूलमध्ये तिस-या इयत्तेत शिकणारी अनन्या भादुले हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. शाळेमध्ये पेपर सोडवत असताना अनन्याला चक्कर आली. शाळेतील शिक्षकांनी तातडीने तिला दवाखान्यात नेले. मात्र यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती तिचे नातेवाईक ऍड राजेश भादुले यांनी दिली आहे. Unfortunate incident | A nine-year-old student died while writing a paper in Pandharpur, Bhadule Arihant Public School
दरम्यान, याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. येथील अरिहंत पब्लिक स्कूलमध्ये दुर्दैवी घटना घडली. शाळेत घटक चाचणी सुरु होती. इयत्ता तिसरीमध्ये शिकत असलेली अनन्या अतुल भादुले ही पेपर सोडवत होती. पेपर सुटण्यास काही वेळ शिल्लक असताना तिला अचानक चक्कर आली. हि बाब वर्गातील शिक्षकांच्या लक्षात आल्यावर तिला तातडीने दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. तसेच तिच्या पालकांशी संपर्क केला. मात्र दवाखान्यात उपचार करण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. अनन्याच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे. शवविच्छेदनाचा अहवाल येणे बाकी आहे.
या बाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद झाली आहे. तिला दोन दिवसापूर्वी ताप होता, अशी माहिती आहे. असे असले तरी अवघ्या नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आज कालच्या धकाधकीच्या जीवनात शैक्षणिक आणि आर्थिक स्पर्धेत मोठी वाढ झाली आहे. यातूनच पालक अनावधानाने आपल्या पाल्यांवर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यामुळेच मुलांमध्ये कमी वयात मोठा ताण तणाव निर्माण झालेला आहे. आणि तो सध्या लहान मुलांमध्ये जाणवतो. मुलांच्या यशस्वी जीवनाचा पाया हा उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य आहे उत्तम शारीरिक आरोग्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम तसेच मानसिक शांततेची गरज आहे. मुलांनी एखादा छंद किंवा कला जो असावी.
– डॉ. शुभांगी तनपुरे, एमबीबीएस
पाल्य आजारी असल्यास पालकांनी पाल्यास शाळेत पाठवू नये. आजारी पाल्य शाळेत पाठवल्यास शाळेतील मुलांना व्हायरल इन्फेक्शन पोहोचण्याचा धोका असतो. त्यामुळे पालकांनी स्वतः खबरदारी घ्यावी. पाल्याचे शिक्षण पुन्हा करता येईल मात्र पाल्याच्या जीवास धोका निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये. स्पर्धेत टिकण्यासाठी पालकांनी पाल्यास मानसिक शारीरिक ताण तणाव देऊ नये.