माळीनगर :– सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एका छोट्या गावातील तरूण अभिनेता अक्षय बनकर टिव्ही मालिकांमधून चांगलाच झळकत आहे. यातून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. Akshay Bunkar, a young actor from Solapurat, is winning the hearts of the audience through TV serials Malshiras Malinagar
माळीनगर (ता.माळशिरस) येथील गावातील तरूण अक्षय बनकर सध्या टिव्ही मालिकांमधून अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. सोनी मराठी, झी मराठी वरील मालिकांमध्ये विविध लक्षवेधी भूमिका तो साकारत आहे. त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.”तू तेव्हा तशी”, “जिवाची होतिया काहिली”, “तुमची मुलगी काय करते”, “दार उघड बाये ” या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या अक्षयने निवेदन, सूत्रसंचालन करत कला क्षेत्रात पदार्पण केले. सुरूवातीला नोकरी सांभाळून रिडिओ करिता 120 दिग्गज कलाकारांच्या मुलाखती घेतल्या. त्यामुळेच पुढे दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील सर्वात जूना शेतकऱ्यांचा कार्यक्रम “आमची माती आमची माणसं” व “कृषीदर्शन” या कार्यक्रमांचे निवेदन करण्याची संधी अक्षयला मिळाली. लवकरच त्याचे शंभर भाग पूर्ण होणार आहेत.
दूरदर्शनवरील कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील गावागावात, घराघरात अक्षयला पोहोचता आले. पुढे भाषेतील प्रभुत्व आणि अभिनय कौशल्यांमुळे त्याला टिव्ही मालिकांमधून काम करण्याची संधी मिळाली. त्याच्या या कामगिरीबद्दल माळीनगर गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. त्याचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण माॅडेल हायस्कूल माळीनगर शाळेत झाले असून बालपणीच्या आठवणी ,स्वप्ने आणि आईवडीलांच्या संस्कारांना याचे श्रेय जात असल्याचे अक्षय सांगतो. त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ माघवारीमध्ये यंदा चार गोल रिंगण व एक उभे रिंगण होणार
सोलापूर : अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून माघवारी पालखी सोहळा 2023 मध्ये यंदा गोल रिंगण चार व एक उभे रिंगण केले जाणार आहे. राष्ट्रिय अध्यक्ष ह भ प सुधाकर महाराज इंगळे यांच्या मार्गदर्शनाने व राष्ट्रीय उपाध्यक्ष ह भ प भागवत महाराज चवरे पंढरपूर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी या दोन्ही पालखीचे पूजन चिठ्ठीव्दारे नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकारी व मान्यवर , पद्मशाली ज्ञाती संस्था यांचे हस्ते श्री मार्कंडेय मंदिर, पंचकट्टा सोलापूर येथे करण्यात येणार आहे.
वारकरी परंपरेतील रिंगण सोहळा हा अतिशय प्रेरणादायी असा सोहळा आहे. रिंगण म्हटले की अबाल वृद्धांना उत्साहित करून महिलांना ही प्रेरित करणारा आहे. प्रत्येक दिंडीतील विणेकरी हे वृद्ध असतात. तरी सुद्धा ते रिंगणामध्ये तरूनांप्रमाणे धावतात. माघवारी पालखी सोहळा परंपरेने चालत आला आहे. यामध्ये 2012 साली पहिले रिंगण होम मैदान येथे सुरु केले. या सोहळ्यास बारा वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे तपपूर्ती वर्ष म्हणून मोठी परंपरा सुरु होत आहे. यंदा या सोहळ्यामध्ये चार गोल रिंगण व एक उभे रिंगण केले जाणार आहे.
1) दि.27-01-2023 रोजी “गोल रिंगण” दु. 4.30 वा. नॉर्थकोट प्रशाला , सोलापूर
( हे रिंगण आषाढी वारीतील माऊलींचे अश्व करणार आहेत.)
2) दि. 29-01-2023 रोजी “गोल रिंगण” सकाळी 9.00 वा. पाटकर वस्ती कुरूल ता. मोहोळ जि. सोलापूर
3) दि. 30 -01-2023 रोजी “गोल रिंगण” सकाळी 9.00 वा. महात्मा गांधी विद्यालय, पेनुर ता. मोहोळ जि. सोलापूर
4) दि. 30 -01-2023 रोजी “गोल रिंगण” दु. 5.00 वा. दत्त प्रशाला , सुस्ते ता. पंढरपूर, जि. सोलापूर
5)) दि. 31 -01-2023 रोजी सकाळी 9.00 वा.” उभे रिंगण” जलाराम महाराज मठ, पंढरपूर
असे नियोजन प्रतिवर्षाप्रमाणे करण्यात आले आहे. हा सोहळा यशस्वी करणेसाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील दिंडी प्रमुख व समिती अध्यक्ष ह भ प मधुकर गायकवाड , प्रदेश अध्यक्ष जोतीराम चांगभले, राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे, प्रदेश उपाध्यक्ष किसन बापू कापसे , प्रदेश सचिव मोहन शेळके , जिल्हा अध्यक्ष बंडोपंत कुलकर्णी , शहर अध्यक्ष संजय पवार, समिती अध्यक्ष शंकर भोसले,शहर सहअध्यक्ष किरण चिप्पा, पालखी प्रमुख श्रीकांत ढगे , शहर उपाध्यक्ष सचिन गायकवाड , पांडुरंग घाटे यांच्यासह आदी पदाधीकारी परिश्रम घेत आहेत. पालखी मार्गावर अपघात होऊ नये म्हणून रिफ्लेक्टर जॅकेट सर्व दिंडीला देऊन रेडियम सुद्धा लावले जाणार आहेत.