सोलापूर : सोलापुरातील श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी मतीन बागवान यांची निवड झाली आहे. मतीन बागवान यांच्या निवडीनंतर महामंडळाच्यावतीने बागवान यांचा सत्कार करण्यात आला. Solapur | Election of Mateen Bagwan as President of Sri Shiv Janmotsav Central Corporation
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या यंदाच्या वर्षीच्या अध्यक्षपदी छत्रपती मुस्लीम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान यांची एकमताने निवड करण्यात आली. सन 2023 – 24 च्या श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सवाची सर्वसाधारण बैठक आज सायंकाळी शिवस्मारक सभागृहात पार पडली.
ही सभा मावळते अध्यख शेखर फंड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पुरुषोत्तम बरडे, पद्माकर काळे, राजन जाधव, माऊली पवार, श्रीकांत घाडगे, दिलीप कोल्हे, सुनिल कामाठी, प्रताप चव्हाण, सुनिल रसाळे, विनोद भोसले, अनिकेत पिसे, भाऊसाहेब रोडगे, विक्रांत वानकर, मनीष काळजे, दत्तात्रय वानकर, विजय पुकाळे, लहू गायकवाड, जितू वाडेकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात हजर होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
याप्रसंगी सुरुवातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पूजन करण्यात येऊन दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर माजी नगरसेवक किरण पवार व महामंडळाचे कार्यकर्ते विजू परदेशी यांना आदरांजली वाहण्यात आली.
त्यानंतर यंदाच्यावर्षी 18 फेब्रुवारी रोजी रात्री पाळणा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची नवीन आकर्षक भव्य मुर्ती प्रतिष्ठानेबाबत नियोजन करण्यात आले. यंदाचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भव्य प्रमाणात करण्याचे आवाहन यावेळी महामंडळाच्या पदाधिकार्यांनी केले आहे.
□ श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे निवडण्यात आलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे –
अध्यक्ष ः मतीन बागवान, कार्याध्यक्ष ः मनिष काळजे, उपाध्यक्ष ः सुनंदा साळुंके, अनिल म्हस्के, अक्षय ब्रिदी, लक्ष्मण भोसले, शक्ती कटकधोंड, लता ढेरे, सेक्रेटरी ः शत्रुघ्न माने, सह सेके्रटरी ः मनिषा नलवडे, राजू पवार, नानासाहेब भोसले, खजिनदार ः महेश बोकण, सहखजिनदार ः प्रकाश जाधव, चक्रपाणी गज्जम, मिरवणुक प्रमुख ः संदीप महाले, मारूती सावंत, राहूल दहिहंडे, विवेक इंगळे, उपमिरवणुक प्रमुख ः बाबा शेख, कार्यालय प्रमुख ः विजय पुकाळे, प्रसिध्दी प्रमुख ः बसवराज कोळी, अमोल मिस्किन, विशाल भांगे.
》 सोलापुरात आजपासून विद्यापीठाची सत्र परीक्षा सुरू
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा आज सोमवारपासून (ता. २३) सुरू होत आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर बैठे पथक नेमण्यात आले आहेत. विद्यापीठाची चार भरारी पथके व एक अचानक भेट देणारे पथक असणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा सोमवारपासून (ता. २३) जिल्ह्यातील ४८ केंद्रांवर सुरू होत आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षेवर बैठे पथक, भरारी पथकाची नजर राहणार असल्याचे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक परीक्षा नियंत्रक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी सांगितले.