अक्कलकोट : पुणे सोलापूर मार्गावर दौंड तालुक्यातील चौफुला येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये अक्कलकोट तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. टायर फुटल्याने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला लक्झरी बस धडकल्याने हा अपघात झाला. यात चार जण ठार झाले तर २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. Pune Accident: Three killed in Akkalkot, accident in Solapur taluka
आज बुधवारी (ता.1 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमी असलेल्या काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. एक लक्झरी बस आज पहाटेच्या सुमारास सोलापूरहून पुण्याच्या दिशेने येत होती. यावेळी चौफुला ओलांडल्यानंतर वाखरी हद्दीत एका ट्रकचा टायर फुटल्याने तो ट्रक महामार्गावरच उभा होता. या उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज लक्झरी बस चालकाला आला नाही. यामुळे बस थेट ट्रकला जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, बसच्या एक बाजूचा चक्काचूर झाला.
अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव, गोगांव व सलगर येथील रहिवासी असलेले व पुणे येथे कामानिमित्त तेथे रहावयास होते. यामध्ये चप्पळगाव येथील अंत्यत गरीब कुटुंबातुन शिक्षण घेऊन नुकतेच स्वतःच्या पायावर उभी राहिलेली युवती आरती अंबण्णा बिराजदार (वय २२ वर्षे) इंजिनिअर शिक्षण पूर्ण केल्याने तिला नुकतेच दोन महिन्यापूर्वी पुणे येथे कामास होती. ती चपळगाव येथे आपल्या आई वडिलांना भेटण्यास नुकतीच येवून मंगळवारी परत पुणेकडे एका लक्झरी बसने प्रवास करीत होती.त्याच्यात मृत्यू झाली. तिच्या पश्चात आई, वडिल, एक भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
गोगाव येथील अमर महांतेश कलशेट्टी (वय २० वर्षे) हा युवक घरावरील कर्जाचे परतफेड करण्यासाठी पुणे येथील भवानी पेठेतील एका पेट्रोल पंपावर कामास होता. स्वत:च्या पायावर उभे रहावे म्हणून पिकअप चारचाकी वाहन घेतलेले होते. सदर वाहनातून माल वाहतूक झाल्यानंतर वाहनाच्या रंगरंगोटी व रेडियम डिझाईनसाठी यवत जवळील एका कारागीराकडे दिले होते. सदर काम झाल्यानंतर सदरील वाहन ड्रायव्हरला घेवून जाण्यासाठी सांगून सोलापूर-पुणे जाणारी लक्झरी बसने पेट्रोल पंपावर कामासाठी निघाला असता काही अंतरावर बस गेली असता अपघात झाला. आर्थिकदृष्ट्या प्रगती करु इच्छिणार्या या युवकावर काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा त्यांचा परिवार आहे.
सलगर येथील गणपती मलप्पा पाटील (वय वर्षे ५०) हे पुणे मार्केट यार्डात अडत व्यापारी, ब्रोकन म्हणून गेली पंधरा वर्षे काम करीत होते. गणपती मल्लप्पा पाटील हा मूळचे सलगरचे असून सध्या कामानिमित्त अप्पर पुणे येथे राहत असून तो पुणे मार्केट यार्डात अडत व्यापारी म्हणून काम करत होता तर तो त्यांचा लहान भाऊ गुंडप्पा यांच्या सोयरीक कामासाठी सोमवारी गणपती व त्यांचा भाऊ गुंडप्पा हे दोघे ही गुंडप्पा च्या लग्नाच्या कच्चा बैठकीसाठी सलगर गावी आले होते तर ते गुंडप्पा चे कच्चा बैठक संपवून तर मंगळवारी गुंडप्पा बसने पुणे ला गेले. व मोठा भाऊ गणपती हा गाणगापूर येथे देव दर्शन करून तर मंगळवारी संध्याकाळी लक्झरी बसने पुण्याकडे निघाले होते तर त्यांचा या अपघातामध्ये मध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच भाऊ, आई, दोन मुले आहेत तर आई मलम्मा घरकाम करत असून तर मोठा मुलगा संजय कुमार हा वयाच्या वीस वर्षांचे असून इंजिनिअर आहे. लहान मुलगा विजयकुमार हा वयाच्या १८ वर्ष असून तो फुलांचा व्यापारी आहे.
● अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
पुणे सोलापूर महामार्गावर आज पहाटे झालेल्या अपघातात पोलीस कर्मचारी नितीन दिलीप शिंदे (वय 36 वर्षे) यांचे निधन झाले आहे. शिंदे हे पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या निधनाने पोलीस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांनी दुःख व्यक्त केले. दौंड तालुक्यातील भांडगाव येथे हा अपघात झाला. खासगी बसचे टायर फुटून ती ट्रकला धडकली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी झाले आहेत. नितीन है पुणे पोलिस दलातील एका कर्मचारी होते. शिंदे हे पुणे गुन्हे शाखेत युनिट २ मध्ये कार्यरत होते.
□ अक्कलकोट तालुक्यात हळहळ
बुधवार हा दिवस अक्कलकोट तालुकावासीयांना अंत्यत दुःखददायक ठरला. चप्पळगाव येथील अंत्यत गरीब कुटुंबातून शिक्षण घेऊन नुकतेच स्वतःच्या पायावर उभी राहिलेली युवती आरती अंबण्णा बिराजदार( वय २२) गोगाव येथील युवक अमर महांतेश कलशेट्टी (२०) व सलगर येथील गणपती मल्लप्पा पाटील (वय ५०) असे तीन जणाचा अपघातामध्ये मृत्यु झाल्याची घटना घडल्याची बातमी तालुक्यात धडकल्याने अक्कलकोट तालुक्यावर शोककळा पसरली.
□ मोहोळ : ट्रॅक्टर उलटून ट्रॉलीतील महिलासह पंधराजण जखमी
सोलापूर – वेगाने जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने ट्रॉलीतील महिलांसह १५ जण जखमी झाले. हा अपघात मोहोळ येथील पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी (ता.31) सकाळच्या सुमारास घडला. जखमी मधील सर्व ऊसतोड कामगार असून ते मोहोळ ते टेंभुर्णी असा प्रवास करीत होते. त्यांना मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रीना वाण्या पाडवी (वय २५) तिचे चार मुले निशा, ज्योती, जितू आणि शर्मिला. सुमित्रा भारत वडवी (वय ३०), तिची मुलगी सेमिना. फुनती गुनीया पाडवी (वय ३०), हेमल पाडवी (वय २५),सुनिता पाडवी (वय २२), हिरा वडवी (वय २५)आणि अन्य चार लहान मुले सर्व रा. खानबरा जि.नंदुरबार)अशी जखमींची नावे आहेत. त्यांना वाण्या पाडवी यांनी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.