सोलापूर : संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी होताना जॉन फुलारे, माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या वतीने पाच लाख रुपयांची अकरा फूटी मूर्ती मध्यवर्ती महामंडळास भेट देण्यात आली. याबद्दल समाज बांधवांनी मोठा आनंद व्यक्त केला. On the occasion of Sant Ravidas Maharaj’s birth anniversary, an eleven foot statue worth five lakhs was gifted to the Central Corporation, Solapur
सोलापुरात प्रथमच अशा भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आल्यानं समाज बांधवामध्ये मोठा आनंद व्यक्त करण्यात आला. अनिष्ट प्रथा आणि रूढीला विरोध करणारे संत रोहिदास महाराज यांची जयंती सोलापुरात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमाने साजरी करण्यात येतं आहे. सोलापुरात हुतात्मा चौक इथं राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रणित संत रोहिदास मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाच्या वतीने संत रविदास महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व पूजन पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे, म न पा अधिकारी संजय धनशेट्टी, मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षा श्रीदेवी फुलारे, अशोक लांबतुरे, संजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग माजी सदस्य सुरेखा लांबतुरे, मधुकर गवळी आदीच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं.
दरम्यान माजी नगरसेविका तसेच उत्सव अध्यक्षा श्रीदेवी फुलारे आणि जॉन फुलारे यांच्या वतीने राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रणित संत रविदास मध्यवर्ती उत्सव मंडळास महाराजांची पाच लाख रुपयांची 11 फूटी मूर्ती भेट स्वरूपात देण्यात आली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
प्रतिष्ठापने निमित्त मान्यवरांनी जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देताना संत रोहिदास महाराजांच्या कार्यकर्तृत्वला उजाळा दिला. फटाक्यांची जोरदार आतषबाजी यावेळी करण्यात आली.
या प्रसंगी राम कबाडे, गणेश तुपसमुद्रे, परशुराम मब्रुखाने, अजय राऊत, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सोलापूर विद्यापीठ उपकुलसचिव मलिक रोकडे, ॲड प्रशांत कांबळे, माजी नगरसेविका संगीता जाधव, माजी उत्सव अध्यक्ष अशोक सुरवसे, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान, बाळासाहेब आळसंदे तसेच उपाध्यक्षा गौराबाई काेरे, रमेश कांबळे, इस्माईल हुलसुरे, राजू कदम, गणेश शिलेदार, उद्योजक सचिन वाघमारे, सहसचिव अविनाश चाबुकस्वार, पत्रकार मनोज हुलसुरे, जीवन शिंदे, पत्रकार लक्ष्मण चाबुकस्वार, शशिकांत कांबळे, तुकाराम चाबुकस्वार, सर्फराज कांबळे महेश गाडेकर, विशाल लांबतुरे, पंकज लांबतुरे आदीसह समाजबांधव उपस्थित होते.