घोडेश्वर : मोहोळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने घोडेश्वर येथील भारतीय स्टेट बँक आँफ इंडिया या बँकेवर आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी यांनी केले. बँकेसमोर गर्दी झाली होती. Congress marches on State Bank to probe Adani Udyog Group
सुलेमान तांबोळी म्हणाले, अदानी समूहातील आर्थिक गैरकारभाराचा पर्दापाश करणार्या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी अथवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधिशांच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी. एल आय सी ,स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर वित्तिय संस्थामधील अदानी समूहातील केलेल्या मोठ्या गुंतवणुकी संदर्भात संसदेत चर्चा व्हावी व गुंतवणुकदारांच्या पैशाला संरक्षण मिळावे यासाठी सरकारने योग्य ते निर्णय घ्यावेत.
यावेळी मुजीबभाई चौधरी, सागर सरवळे, मेजर दादासाहेब पाटील यांची भाषणे झाली. निवेदन स्टेट बँकेचे मॅनेंजर यांना देण्यात आले. एपीआय अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला.
यावेळी सरपंच प्रकाश सपाटे, आप्पा पवार,नागेश वाघ,राहील पवार,महादेव यादव,राजु भोई, सिध्देश्वर वराडे,सागर गरड,सचिन घोडके,प्रशांत पाटील,भगवान मामा आसबे,आण्णा जाधव,अनिल सरवळे,ईब्राहिम शेख बाळासाहेब जमादार,अनिल काकडे,आकाश जाधव,सौरभ कांळे,सरदार तांबोळी,रामभाऊ सुरवसे,राजाभाऊ खांडेकर,जावेद तांबोळी,शिवाजी सुतार,अविनाश खोत,इरफान बागवान ,शकिल शेख,यासीन तांबोळी ,रियाज तांबोळी,प्रशांत पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 कसबा पोटनिवडणूक – काँग्रेसचा उमेदवार जाहीर
पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे उमेदवार हेमंत रासने लढत पाहण्यास मिळणार आहे.
काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी टिळक कुटुंबीयांची भेट घेतली. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक नाराज असल्याचे वृत्त होते. त्यानंतर आता धंगेकरांनी शैलेश टिळकांची भेट घेतली आहे. ‘या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. टिळक कुटुंब अजून दुःखातून सावरू शकलेले नाही. आपण सर्वांनी त्यांना आधार देण्याची गरज आहे’, असे धंगेकर यांनी म्हटले आहे.