….यावर सुशीलकुमार शिंदेंची आली प्रतिक्रिया
मुंबई – नाशिक पदवीधर विधानसभेच्या निवडणूकीपासून सुरू असलेली काँग्रेस पक्षातील अंतर्गत खदखद आता वेगळ्या वळणावर आली असून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज आपल्या गटनेते पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे दिला आहे. Balasaheb Thorantani resigned as Congress group leader, BJP offered Sushil Kumar Shinde Chandrasekhar Bawankule
कालच बाळासाहेब थोरांतानी पक्षश्रेष्ठीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधात पत्र लिहून आपली तीव्र नाराजी कळवली होती. त्यानंतर थोरांताचं गटनेतेपद धोक्यात आल्याची चर्चा होत असतानाच आज स्वतः थोरात यांनीच गटनेते पदाचा राजिनामा दिला आहे. यावरून कॉंग्रेसमध्ये पटोले विरूध्द थोरात असा राजकीय संघर्ष सुरू झाल्याच दिसून येत आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी माझी फोनवरून चर्चा झाली. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच थोरात यांनी राजीनामा दिल्याचे मला सांगितले, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मविआकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पवार यांनी ही माहिती दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान थोरांताच्या राजिनाम्यावर बोलताना पटोले यांनी त्यांचा राजिनामा आमच्याकडे आलेला नाही. आमचं त्यांच्याशी कोणतही बोलणं झालेलं नाही असं म्हटलयं. थोरांताच्या राजिनाम्यानंतर काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये आली असून कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील मुंबईत येत असून ते पटोले थोरात यांचा वाद मिटवणार असल्याचीही माहिती आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता थोरातांच्या राजीनाम्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली आहे. प्रभारी एच के पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते थोरात यांची भेट घेऊन थोरातांची समजूत काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष असेल.
□ ‘भाजपत कुणालाही यायचे असेल तर स्वागत करू’ – भाजपा
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल विधान केले. ‘बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेससाठी मोठे काम केले. नऊ वेळा त्यांनी काँग्रेसकडून विधी मंडळात प्रतिनिधित्व केले. सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. कुणालाही भाजपमध्ये यायचे असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करू. त्यांची उंची भाजपमध्ये आल्यावर कायम राहील याची काळजी घेऊ’, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
□ बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला नाही ?
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आपले भाचे सत्यजीत तांबेच्या प्रकरणानंतर आता थेट काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला असल्याचे समोर आले होते मात्र थोरात यांनी दिल्लीला जे पत्र पाठवले आहे ते राजीनामा आहे की नाही हे माहिती नसल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा तर्क वितर्क लावले जात आहेत.