● नववीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग, शिक्षकावर गन्हा दाखल
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील एका माध्यमिक शाळेत नववीत शिकणाऱ्या मुलीचा हात पकडून तू माझ्यासाठी खास आहेस असे म्हणत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी त्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Solapur | Molesting of female students by the teacher during the paper Mohol paper
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील एका नामांकित खाजगी शाळेत नववीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींचा सहा जानेवारी रोजी मराठीचा पेपर सुरू असताना पीडित फिर्यादी मुलीच्या बेंच जवळ जाऊन तिचा हात पकडून तिच्या हातातील घड्याळात वेळ बघण्याचा बहाणा करून तिच्याजवळ थांबून वारंवार तिचा हातात हात घेऊन स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबंधित मुलीने विचारणा केली असता त्या शिक्षकाने गप्प बस नाहीतर तुझे मार्क कमी करेन अशी धमकी दिली.
पेपर संपवून पीडित मुलगी मैत्रिणी सोबत घरी जात असताना त्या शिक्षकाने संबंधित दोन्ही मुलींकडे वाईट नजरेने बघितले. दरम्यान फिर्यादी पीडित मुलीची मैत्रीण सायंकाळी आठ वाजता तिच्या घरी गेली व सांगू लागली की आज दुपारी पेपर सुरू असताना सर नेहमी माझ्या बेंचवर येऊन बसत होते. त्यावेळी मी त्यांना माझ्या बेंचवर बसू नका असे सांगून देखील ते बेंचवर बसून माझा मोबाईल नंबर मागत होते. मी त्यावेळी माझ्याकडे मोबाईल नाही माझ्या वडिलांकडे असतो असे सांगितले. त्यानंतरही त्यांनी हात धरून हातात हात घेऊन तू माझ्यासाठी खास आहेस असे म्हणत एका पेपरवर त्यांचा स्नॅपचॅट या ॲप्लिकेशनचा आय डी लिहून दिला. व त्यावरती मेसेज करण्यासाठी सांगितले मी मोबाईल वापरत नाही असे सांगितल्यानंतरही त्यांनी व्हाट्सअॅप किंवा स्नॅपचॅटवर मेसेज असे सांगून निघून गेले.
मी शाळेतून घरी गेल्यानंतर अभ्यासासाठी माझ्या वडिलांचा मोबाईल घेऊन बसले असताना शाळेतील सरांनी हाय म्हणून मेसेज केला. त्यावेळी मी त्यांना बोला की सर असा मेसेज केला असता सरानी स्नॅपचॅट वर मेसेज करण्यास सुरुवात केली व बोलू लागले. त्यावेळी त्यांनी मला तू माझ्यासाठी खास आहे असा मेसेज केला होता. शेवटी घाबरलेल्या दोन्ही मुलींनी हीं घटना पालकांना सांगितली. त्यानुसार पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादी नुसार शिक्षक सिध्देश्वर बजरंग वागज याचे वरती विनयभंगाचा गुन्हा सात फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आला असून याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 वेळापूर- धानोरे रोडवर मोटरसायकलींची धडक, एक ठार; दोघे जखमी
सोलापूर : वेळापूर (ता. माळशिरस) येथील वेळापूर- धानोरे तांदुळवाडी रोडवर चव्हाणवाडी जवळ महादेव लोंढे यांच्या शेताजवळ दोन मोटर सायकलची धडक होऊन यामध्ये हणमंत भानुदास हगवने (रा. खळवे) हा जागीच मयत झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.४५ च्या सुमारास वेळापूर येथील रोहित विजय माने हा एपी ०९ बी एल ४०३३ मोटार सायकलवरून डेअरीला दूध घालून धानोरे कडे घरी जात होता तो मोहन लोंढे यांच्या केळीच्या बागेजवळ आला असता केळीच्या बागेमधून केळीतील रोडवरुन औषध मारण्याचे पंप साहित्य घेऊन मोटार सायकल नंबर एम एच १३ ए बी ८७६२ वरून हणमंत भानुदास हगवणे व सुधीर गणपत चव्हाण दोघे राहणार खळवे हे केळी बागेतून रोडवर येताना दोन्ही मोटरसायकलची जोरदार धडकून होऊन यामध्ये खळवे येथील हनुमंत भानुदास हगवणे हा जागीच मयत झाला तर सुधीर गणपत चव्हाण राहणार खळवे व रोहित विजय माने राहणार वेळापूर हे जखमी झाले.
घटनेची माहिती कळताच वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव व पोलीस कर्मचारी हजर होऊन जखमींना त्वरित दवाखान्यात हलवण्यासाठी सहकार्य केले. दरम्यान आज रोजी वेळापूर धानोरे रोडवर जो अपघात झाला त्यामध्ये वेळापूर येथील अविराज मुंगुस्कर याने जखमींना तातडीने उपचारासाठी मदत केल्याबद्दल त्याचा वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव यांच्या हस्ते वेळापुर पोलीस स्टेशन येथे सत्कार करण्यात आला.
¤ वेळापूर आरोग्य केंद्रात दोन ॲम्बुलन्स उभ्या असतानाही जखमींना मदत नाही
वेळापूर येथे अपघात घडला असता जखमींना औषध उपचारासाठी तातडीने पाठवण्यासाठी १०८ वरून फोन करून मदतीची मागणी केली असता व वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन ॲम्बुलन्स उभ्या असतानाही फोनवरून मदत मागितली असता चालक उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आले.