सोलापूर : सोलापूर शहरातील गजबजलेल्या सात रस्ता भागात दुचाकी अडवून ठेकेदाराला मारहाण करून त्याला कारमधून पळवून नेण्याचा प्रयत्न पुण्याच्या सहा महिलांकडून झाला. परंतु बेगमपेठ परिसरात त्यांना रोखण्यात यश आल्याने अपहरणाचा प्रयत्न फसला आहे. The plan to abduct a contractor on Seven Streets failed; A case of robbery has been registered against seven women
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ठेकेदार आकाश काळे (वय- २८, रा. दक्षिण कसबा) हे आपल्या एका सहकार्यासह दुचाकीवरून सातरस्ता येथून निघाले होते. त्यावेळी एक इंडिगो कार त्यांच्या गाडीला आडवी लावण्यात आली. त्यामुळे त्यांनी दुचाकी थांबवली. तेव्हा कारमधून उतरलेल्या महिलांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांना कारमध्ये बसवले आणि कार रंगभवनमार्गे विजापूरवेसच्या दिशेने निघाली. कार बेगमपेठेत आली असता काळे यांचा दुचाकीवरील सहकारी तेथे आला व त्याने आपली गाडी कारला आडवी लावली आणि कार थांबल्यानंतर त्याची चावी काढून घेतली. त्यामुळे महिलांची कार जागेवर थांबली.
यावेळी महिलांनी तेथेही गोंधळ घालण्यास सुरुवात केली. रस्त्यावर बराच गोंधळ सुरू झाल्याने जेलरोड पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यांना सर्व प्रकार समजल्यानंतर त्या महिलांना त्यांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी महिला व आकाश काळे यांना सदर बझार पोलीस ठाण्यात आणले. याबाबत रात्री उशिरा सात महिलावर दरोडय़ाचा गुन्हा दाखल केला.
● सात महिलांवर दरोड्याचा गुन्हा दाखल
येथील एका तरुणाला पळवून नेऊन मारण्याचा प्रयत्न केला. मोबाईल काढून घेतला. दरोडाप्रकरणी सात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आकाश काळे (रा. दक्षिण कसबाचौपाड) यांनी सदर बझार पोलिसात बुधवारी फिर्याद दिली. प्रियाकाशिनाथ गायकवाड (रा. सय्यदनगर, पुणे), पल्लवी गोड (रा. बिबेवाडी, पुणे), सोनापाटोळे (रामटेकडी, पुणे), कलावती गायकवाड (कोंढवा खुर्द, पुणे), रोहिणी शिंदे (कोथरूड, पुणे), काजल शिंदे (हडपसर, पुणे), विद्यापाटोळे (रा. सेंट्रल हॉल, पुणे) या सात महिलांवर गुन्हा दाखल झाला. कारचा (एमएच १३, ए झेड ४१३१) चालक अजय वाघमारे (रा. पुणे) यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. सातही जणांना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांनी दिली.
● पोलीस ठाण्यात गोंधळ अन् राजकीय पक्षाकडून दबाव
महिलांनी पोलीस ठाणे आवारातही गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांना तेथे क्यूआरटी पथकाला बोलवावे लागले. तेथील पोलिसांनी चौकशीला सुरुवात करताच त्यांच्यावर पुण्यातून एका राजकीय पक्षाकडून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. स्थानिक कार्यकर्तेही पोलीस ठाण्यात आले होते. ठेकेदार काळे यांनी त्या महिलांना आपण ओळखत नसल्याचे पोलिसांना सांगितले, त्यामुळे त्यांना मारहाण करून त्यांना पळवून नेण्याचा या महिलांचा नेमका हेतू काय होता, हे समजू शकले नाही. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
● पोलिसांनाही केली धक्काबुक्की
कारमधून आलेल्या महिलांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील अश्लील भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या महिला सोलापुरात कशासाठी आल्या? त्यांचा उद्देश काय असावा ? त्यांची मोठी टोळी आहे का ? यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात हाणामारी, तिघे जखमी
सोलापूर : शेतजमिनीच्या वादातून पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात दोन पक्षकारांमध्ये झालेल्या हाणामारी झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. यामध्ये तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यासंदर्भात दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सचिन नामदेव चव्हाण (वय ४३ वर्षे, रा. सुस्ते, तालुका पंढरपूर) हे आणि त्यांचा मुलगा सुयश सचिन चव्हाण जिल्हा सत्र न्यायालयात शेतजमिनीच्या वादासंदर्भात तारीख असल्याने आले होते.
कोर्टाच्या आवारामध्ये गाडी लावून कोर्टामध्ये जात असताना दुसरा वादी असलेल्या बाबू निवृत्ती जाधव याने फिर्यादी सचिन चव्हाण यांच्या डोक्यात दगड मारला तसेच उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोट चावा घेऊन जखमी केले.
त्याचबरोबर मुलगा सुयश सचिन चव्हाण यास रमेश बाबू जाधव याने लाथाबुक्क्याने मारहाण केली. शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. सचिन नामदेव चव्हाण यांच्या तक्रारीवरून पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हाणामारीच्या घटना सार्वजनिक ठिकाणी किंवा आजूबाजूला आपण पाहत असतो मात्र न्यायालयाच्या आवारातच हाणामारी झाल्याने याबाबत आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.