सोलापूर – शेतातील विद्युत डीपीवर चढून काम करताना शॉक बसून कंत्राटी कामगार जागीच मयत झाला. ही घटना कंदर (ता. करमाळा) येथे सोमवारी (ता. 6) सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात करमाळ्याच्या पोलिसांनी संबंधित विद्युत अभियंता आणि दोघा ऑपरेटर विरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. Contract worker dies of shock; A case has been registered against three people including an electrical engineer Solapur Karmala
गोविंद बाबुराव खोडवे (२८ रा. येलडा ता. अंबाजोगाई जि. बीड) असे मयत झालेल्या कंत्राटी कामगाराचे नाव आहे. तो सोमवारी सकाळच्या सुमारास कंदर येथील उजनी जलाशयाजवळ असलेल्या आरिफ इनामदार यांच्या शेताजवळील डीपीवर चढून काम करीत होता. त्यावेळी अचानक विद्युत पुरवठा चालू झाल्याने गोविंद हा जागीच मयत झाला होता.
या प्रकरणी मयताचे चुलत बंधू पंडित खोडवे यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी संबंधित विद्युत अभियंता तसेच किशोर नागनाथ तळेकर आणि ज्ञानदेव तुकाराम लोकरे (विद्युत ऑपरेटर , रा. कंदर) या तिघाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास फौजदार माहुरकर करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● मंगळवेढा येथे दोन ठिकाणी घरफोडी; ७० हजाराचे दागिने लंपास
सोलापूर – मंगळवेढा येथील बनशंकरी कॉलनीत राहणाऱ्या श्रीकांत दिलीप ढगे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने ७० हजाराचे दागिने पळविले. ही चोरी सोमवारी (ता.6) सायंकाळी ५ ते ७ या सुमारास घडली. चोरट्यांनी ढगे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून २० ग्रॅम सोन्याचे दागिने पळविले. तसेच जोगेश्वरी मंगल कार्यालयाजवळ राहणारे शुभम ज्ञानेश्वर शिंदे यांचे घर अशाच पद्धतीने फोडले. मात्र त्या ठिकाणी काही चोरीस गेले नाही. या घटनेची नोंद मंगळवेढा पोलीसात झाली. हवालदार जाधव पुढील तपास करीत आहेत.
● बस स्थानकाजवळ वृद्ध महिलेस मारहाण
बस मधून उतरून पायी जात असताना लाथा बुक्क्याने केलेल्या मारहाणीत शोभा जहांगीर भोसले ( वय६० रा. वैराग ता. बार्शी) ही महिला जखमी झाली. ही घटना बुधवारी (ता. 8) दुपारच्या सुमारास बस स्थानकाजवळ घडली.
शोभा भोसले या वैराग येथून सोलापूर येथे एसटीने आल्या होत्या. पायी जात असताना त्यांचा भाऊ शावरू काळे त्याची पत्नी सरीता, दोन मुले गणेश आणि सुरेश आणि सुन स्वाती पिंटू भोसले यांनी पूर्वीच्या भांडणावरून मारहाण केली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली आहे .