● बालाजी अमाईन्सकडून 1.30 कोटी खर्चून केले नूतनीकरण
सोलापूर : बालाजी अमाईन्स, सोलापूर यांच्या वतीने सी.एस.आर अंर्तगत सोलापूर महानगरपालिकेचे पुण्यश्लोक अहिल्यादेची होळकर प्रसुतीगृह नूतनीकरणाचे व सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. Dufferin Hospital has 24 hours service and facility for about 50 deliveries per day CSR Fund Balaji Amins
महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहार यांनी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांना दमाणी ब्लड बँक येथे बैठकीसाठी आले होते. यावेळेस हॉस्पीटलला भेट देण्याची विनंती केली. डॉ लोहार यांचे विनंतीनुसार राम रेड्डी यांनी हॉस्पीटला भेट दिली. या ठिकाणी शहरातील मध्यवर्ती भागात झोपडपट्टी व चाळीतील गरीब कामगार महिला या हॉस्पीटल मध्ये ओ. पी. डी. व प्रसुतीगृहात उपचारास येत असतात. येथील आरोग्यसेवेची पहाणी केल्यावर तेथे होणारी गर्दी, गैरसोय, अंर्तगत मांडणी, हे पाहून हॉस्पीटल चे नुतनीकरण सुशोभीकरण बालाजी अमाईन्सच्या सी. एस. आर अंर्तगत करण्याचे ठरविले.
हॉस्पीटल मधिल जुनी रचना व जुने ऑपरेशन थिएटर, तसेच प्रसुतीकक्ष ओ. पी. डी याचे विस्तारीकरण करण्याचे ठरविले. मागील आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे यांनी नविन रचना व नविन ऑपरेशन थिएटर तसेच प्रसुतीकक्ष ओ. पी. डी या कामाचे स्वरूप ठरविले नंतर कामाची सुरवात केली.
सोलापुरातील डफरीन हॉस्पीटल शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. डफरीन हॉस्पीटलमधिल दररोज ओ. पी. डी साठी व ऑपरेशनकरीता रुग्णांची होणारी गर्दी जास्त असते. हॉस्पीटल चे नुतनीकरण व विस्तारीकरणचे जुलै २०२२ पासून प्रत्यक्ष कामास सुरवात केली. आयुक्तांनी सुचविल्याप्रमाणे डफरिन हॉस्पीटल येथिल दोन्ही मजल्यावरील सर्व रूम व वार्ड तसेच हॉस्पीटलचे ऑफिस, ऑपरेशन थिएटर, लेबररूम दोन मोठे वार्ड, नविन लिफ्ट करीता आवश्यक बदल करून त्याठिकाणी बांधकाम व फरशीकरण तसेच रंगरंगोटी दरवाजे खिडक्या यात बदल करून नव्यापध्दतीचे अद्ययावत हॉस्पीटल बनवले आहे.
महानगरपालिका हॉस्पीटलमधील स्टेचर लिफ्ट च्या कामकरीता ओ. सी स्पेशालिटी यांनी १४ लाख रूपये निधी दिला आहे. या कामी महानगरपालिकेचे आयुक्त शितल तेली-उगाले, उपआयुक्त विदया पोळ, वास्तुविशारद मनोज मर्दा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● बालाजी अमाईन्स लि सोलापूर यांचेवतीने सी. एस. आर अंर्तगत केलेली कामे
१. ऑपरेशन थिएटर मॉड्युलर ओ. टी. ऑपरेशन थिएटर अदयावत करून नुतनीकरण केले व त्याकरीता लागणारे उपकरणे दिली.
२. अदयावत प्रसुतिगृह लेबररूम अदयावत, नविन साहित्य व मशीन भेट,
३. दोन मोठे वार्ड
४. हॉस्पीटल करीता नविन मशीन व साहित्य
५. लिफ्ट
६. लिफ्ट करीता बांधकामात बदल करून तद अनुशंगिक बांधकाम व नविन लिफ्ट. गरोदर महिलांना पायरी चढताना त्रास होऊ नये म्हाणून लिफ्टची सोय केली आहे.
७. हॉस्पीटल मधिल ऑपरेशन थिएटर व लेबररूम करीता मेटाफेल्स कंपनीचे आधुनिक एअरलॉक दरवाजे संपूर्ण प्रसुतिगृहाचे फ्लोअरिंग बदलणे.
● १.३० कोटी खर्चातून केले नूतनीकरण
स्वच्छतागृहाचे बांधकाम. अंतर्गत बदलाप्रमाणे बांधकाम व गिलावा संपूर्ण इलेक्ट्रिकल वायरिंग बदलणे. फॉल्स सिलिंग अंतर्गत व बाहेरील संपूर्ण ईमारतीचे रंगकाम,अद्ययावत प्रसुतिगृह अद्ययावत शस्त्रक्रिया विभाग अॅल्युमिनियम पार्टीशन करून आधुनिक वार्डची रचना.दरवाजे आणि खिडक्या लिफ्ट / उदवाहन व्यवस्था शहरातील मध्यवर्ती भागात असलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाचे नूतनीकरण विस्तारीकरण नुतनीकरण व सुशोभीकरण बालाजी अमाईन्सच्या सी. एस. आर निधी मधून एक कोटी रूपये तीस लाख खर्च करून करण्यात आले. एखाद्या मल्टीस्पेशॉलिटी प्रायव्हेट हॉस्पीटल वाटावे असे अद्यावत करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रसूतिगृहातील ऑपरेशन थिएटर व लेबररूम एकाच ठिकाणी केले आहे त्यामुळे तेथे २४ तास सेवा देण्यास येईल तसेच दररोज सुमारे ५० प्रसूती करता येतील. शहारातील गरीब व कामगार भागातील लोकांना डफरिन हॉस्पीटल येथे चांगली रुग्णसेवा मिळावी तसेच सिव्हिल हॉस्पीटल वरील ताण कामी व्हावा त्याकरीता हा प्रयत्न आहे. महानगरपालिकेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृह सर्व नविन कामा मुळे एक आर्कषक अदयावत आधुनिक हॉस्पीटल झाले आहे,असेही रेड्डी यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, वास्तुविशारद मनोज मर्दा , डॉ. ज्ञानेश्वर सोडल, सिद्धेश्वर बोरगे आदींसह अधिकारी उपस्थित होते.