● उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून रस्ते विकासाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. निर्माण झालेल्या हायवेमुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यात चांगले उद्योग येण्यासाठी कुंभारी, अक्कलकोट, पंढरपूर, मोडनिंब चिंचोळी नव्याने एमआयडीसी निर्माण केल्या जाणार आहेत. कुंभारी औद्योगिक क्षेत्राची हायपॉवर कमिटी तयार झाली आहे. Kumbhari MIDC land acquisition soon; MIDC regional office announced in Solapur by Solapur Industries Minister Uday Samant
लवकरच ९४६ हेक्टर जागेचे भूसंपादनाची प्रक्रिया चालू केली जाणार आहे. मंद्रुपच्या शेतकऱ्यांचा एमआयडीसीला विरोध असेल तर शेतकऱ्यांवर जबरदस्ती केली जाणार नाही. त्यांच्या जमीन लवकरच परत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उद्योग विभागाचा आढावा आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांची संवाद साधताना सामंत म्हणाले, जिल्ह्यातील सुरत चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडोर, नागपूर गोवा हायवे, हैदराबाद सुरत, पुणे- मुंबई हे हायवे सोलापुरातून जात आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये एमआयडीसीमधील जागा कमी पडतील. त्यामुळे काही नव्याने तर काही एमआयडीचा विस्तार केला जाणार आहे. कुंभारी एमआयडीसीचे ९४६ हेक्टर वर आहे. हाय पॉवर कमिटी गठित झाली आहे. दर फायनल झाला आहे. लवकरच भूसंपादनाची कार्यवाही चालू केली जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
अक्कलकोटमध्ये १०० तर पंढरपुरात १५१ हेक्टरवर एमआयडीसी होणार आहे. जागा निश्चितीसाठी १५ फेब्रुवारीला भू-निवड समिती अक्कलकोट आणि पंढरपुरात येणार असल्याचे सांगितले. सोलापूर चिंचोळी औद्योगिक वसाहतीमध्ये जागा शिल्लक नसल्याने या एमआयडीसीचा विस्तार करण्यासाठी १५१ हेक्टर जागा भू-संपादन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोडनिंब येथे देखील ३२२ हेक्टर औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. सोलापुरात एमआयडीसीचे कार्यालय चालू करून एक खिडकी योजने अंतर्गत सर्व सुविधा दिल्या जातील.
यासाठी लागणाऱ्या इमारतीसाठी ४ कोटी ५१ लाखांच्या निधीची घोषणा केली. आठ दिवसात त्याचा आदेश काढला जाणार असल्याचे सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
> मंद्रुपच्या जागा शेतकऱ्यांना परत करणार
दक्षिण सोलापुरातील मंद्रुप येथील शेतकऱ्यांचा एमआयडीसीसाठी संपादित केलेल्या जागेला विरोध आहे. एकरी ६५ लाखांची मागणी केली आहे. मात्र, हायपॉवर कमिटीने २५ लाख दर फायनल केला आहे. त्यामुळे ज्यांना जमीन द्यायची नाही त्यांच्यावर जबरदस्ती केली जाणार नाही. लवकरच भूसंपादन केलेल्या जमिनीबाबत डी नोटीफिकेशन ऑडर काढण्याची घोषणा उद्योग मंत्र्यांनी यावेळी केली.
> उद्योग मंत्र्यांच्या घोषणा
* चिंचोळी एमआयडीसी रस्ते विकासाठी ४ कोटी ३० लाख
* टेंभुर्णी एमआयडीसी रस्ते विकास ३ कोटी ७० लाख
* बार्शी एमआयडीसीची पाणी पुरवठ्यासाठी ४ कोटी
* अक्कलकोट रोड एमआयडीसी रस्ते विकासासाठी २० कोटी