मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पदावरुन पायउतार झाले आहेत. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती दौपती मूर्मू यांनी स्विकारला आहे. तसेच त्यांच्याजागी रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. कोश्यारी यांनी 4 आठवपूर्वीच आपल्याला पदमुक्त करावे, अशी इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केली होती. Maharashtra gets a new governor, Bhagat Singh Koshyari steps down Ramesh Bais controversial resignation approved
भगतसिंग कोश्यारी यांचा महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्विकारला असून, नव्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच फुले दांपत्य यांच्या विषयी जनभावना दुखावणारी विधाने केली होती. त्यामुळे विरोधकांकडून वारंवार त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. भाजपाच्या देखील काही नेत्यांनी त्यांच्या विधानांवर नाराजी व्यक्त केली होती.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकृत केला आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील विरोधी पक्षांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यभर आंदोलने केली होती. राज्यपाल बदलण्यात यावे अशी मागणी राज्यात जोर धरत होती. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी स्वतःच राजीनामा पाठवून दिला होता.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. कोश्यांरींचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. कोश्यारी सातत्याने महाराष्ट्राचा अवमान करत होते. राज्यपालांची हकालपट्टी करा, अशी मागणी आम्ही सातत्याने केली होती. त्यांनी देखील पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता त्यांचा राजीनामा मंजूर झाला. एका अर्थाने महाराष्ट्रातून घाण गेली, अशी जहरी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● नियुक्ती करण्यात आलेले नवे राज्यपाल व उपराज्यपाल
*बिस्वा भूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगढ
* निवृत्त ब्रिगेडियर बी. डी. मिश्रा, उपराज्यपाल, लडाख
*राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार
* रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र
* फागू चौहान, राज्यपाल, मेघालय
* एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड
* अनुसुईया उईके, राज्यपाल, मणीपूर
*शिवप्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश
* एस. अब्दुल नझीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश
*गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसाम
* सी. पी. राधाकृष्णन, राज्यपाल, झारखंड
*लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्कीम
*कैवल्य त्रिविक्रम परनाईक, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश