● अर्पिता कपूरने माणुसकी दाखवत गुन्हा दाखल करण्यास दिला नकार
सोलापूर : टीव्हीवर गाजत असलेल्या सीआयडी मालिकेमध्ये पोलीस अधिकाऱ्याची भुमिका करणाऱ्या आर्पित कपूर यांच्या पत्नीचे लग्न मंडपातून चोरीस गेलेल्या साडेपाच तोळ्याचे गंठन फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी १२ तासाचे आतमध्ये रिकव्हर केले. CID serial police officer’s wife’s lost jewelery recovered within 12 hours, Arpita Kapoor refused to file a case showing humanity
या घटनेची हकीकत अशी, मुंबई येथील टीव्ही कलाकार व सीआयडी मालिकेतील सीआयडी आर्पित कपूर व त्याची पत्नी श्रमीका हे त्यांच्या मेव्हण्याच्या लग्नासाठी शुक्रवारी ( १० फेब्रुवारी) सोलापूर येथील वेदा बॅन्केट या मंगलकार्यालयामध्ये आले होते. लग्न लागण्यापूर्वी त्यांचे चोरीस गेलेले गंठन लग्न लागल्यानंतर दीड वाजण्याचे त्यांच्या लक्षात आले.
या संदर्भात त्यांनी मंगलकार्यालयामध्ये नातेवाईकांकडे विचारपूस करून सायंकाळी ५.०० वा.चे सुमारास त्याने फौजदार चावडी पोलीस स्टेशन गाठले. त्यांचेकडे विचारपूस करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील व त्यांचे पथक लगेच तात्काळ मंगल कार्यालयात पोहोचले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने व तपासाचे चक्रे फिरवून संशयित लोकांकडे तपास केला असता,हेअर ड्रेसींग करण्यासाठी आलेल्या महिलेकडे चोरीस गेलेले सोन्याचे गंठन मिळून आले. हे गंठन श्रमीका यांना परत करण्यात आलेले आहे. या प्रकाराबाबत माणुसकी दाखवत आर्पित कपूर यानी ती महीला ही घटस्पोटीत व तिला चार वर्षांची लहान मुलगी असल्याने तिच्या विरुद्ध तक्रार देण्यास नकार दिला.
आर्पित कपूर यांनी आजपर्यंत केलेल्या सीआयडी मालिकेतील भूमिका आणि फौजदार चावडी पोलिसांकडून करण्यात आलेल्या वास्तव कामगिरीबाबत खूप साम्य असल्याचे सांगून त्याबाबत पोलीसांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● वळसंग येथे अंगावर गाडी घालून खुनाचा प्रयत्न; दोघाविरुद्ध गुन्हा
सोलापूर – पूर्वीच्या भांडणावरून अंगावर गाडी घालून तसेच गळा दाबून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना वळसंग (ता.दक्षिण सोलापूर) येथील श्रीशैल लॉजजवळ बुधवारी (ता. ८) रात्रीच्या सुमारास घडली.
निखिल नीलकंठ बिराजदार (वय २६ रा. कुंभारी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून वळसंगच्या पोलिसांनी श्रीनिवास गायकवाड आणि राहुल गेजगे (दोघे रा.सेटलमेंट सोलापूर) या दोघांवर खुनाचा प्रयत्न आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला.
निखिल बिराजदार हा बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वळसंग येथील श्रीशैल लॉज जवळ मित्रांसोबत थांबला होता. त्यावेळी दोघांनी त्यांचे त्याच्या अंगावर वाहन घातले. आणि त्याच्या दिशेने तलवार फेकली. त्यानंतर त्याचा गळा दाबून मारहाण केली. अशी नोंद पोलिसात झाली आहे.
□ नागणेवाडी येथे ओपन जिम मधील २ लाखाची लोखंडी साहित्य पळविले
सोलापूर – नागणेवाडी (ता. मंगळवेढा) येथील ओपन जिम मधून चोरट्यांनी २ लाख रुपये किमतीचे लोखंडी साहित्य पळविले. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
या संदर्भात नगरपालिकेचे नितेश भाऊ रणखांबे यांनी मंगळवेढा पोलिसात फिर्याद दाखल केली. नागणेवाडी येथील तलावाजवळ क्रीडा विभागाकडून ओपन जिम उघडण्यात आले होते. त्या ठिकाणचे २ लाखाचे साहित्य अनोळखी चोरट्याने पळविले. अशी नोंद मंगळवेढा पोलिसात झाली आहे .