सोलापूर : रब्बीच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खरीप क्षेत्र वाढल्याने सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने उभारले. सोलापूरचे कारखानदार खूप नशिबवान असून त्यांच्याविरूद्ध शेतकरी आंदोलन करीत नाही. पण, सर्वाधिक वजनात काटामारी आणि रिकव्हरी चोरी राज्यात कुठे होत असेल तर ती सोलापूर जिल्ह्यात होते, असा आरोप गंभीर माजी राज्यमंत्री रयतक्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केला आहे. Solapur tops in recovery and Katamari; A serious accusation of fraud against the sugar factories of Solapur! Patil Sharad Pawar of Osad village
उसाच्या एफआरपीसंदर्भात तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दिपक भोसले उपस्थित होते. खोत पुढे म्हणाले, १९८० च्या दशकात शरद जोशी यांनी शेतकऱ्यांना हक्कासाठी बोलायला व लढायला शिकवले. पण, शेतकऱ्यांना लुटणाऱ्या मुठभर लोकांना बळीराजाची प्रगती नको आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढली. ती सर्वसामान्यांसाठी नव्हे तर स्वत:च्या पक्षासाठीच होती, असा आरोपही खोत यांनी यावेळी केला.
● पक्ष विसरून कारखानदारांकडून शेतकऱ्यांची लूट
माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार पक्ष विसरून ‘चोर चोर मावस भाऊ अन् अर्धे अर्धे वाटून खाऊ’ या भूमिकेतून शेतकऱ्यांना लूटत आहेत. येथील शेतकरी कारखानदारांना त्रास देत नाही आणि त्यांना लगेच पैसे पण लागत नाहीत. त्यामुळे सोलापूरचे कारखानदार नशिबवान आहेत. कोल्हापूर, सांगलीप्रमाणे सोलापूरचे कारखाने एफआरपी देत नाहीत. त्याविरूद्ध आंदोलन उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात राज्य सरकारमधील मंत्री, माजी मंत्री व भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे कारखाने आहेत. खोत यांच्या आरोपांमुळे आता त्या नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ पवार म्हणजे ओसाड गावचे पाटील आणि संजय राऊत म्हणजे टाइमपास चॅनल
शरद पवारांचे आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात गौतम अदानींचे कौतुक करण्यात आले आहे. असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, पवारांच्या पुस्तकात शेतकऱ्यांचं कौतुक झालं नाही, परंतु अदानींचं करण्यात आले आहे. पवार हे ओसाड गावचे पाटील असून, त्यांच्या बोलण्याला फारसा अर्थ असत नाही. त्यामुळे ते बोलू शकतात. तसेच बोलणं हे जिवंतपणाचं लक्षण असतं अशी बोचरी टीका खोत यांनी केली आहे. यावेळी पवारांवर टीका करण्याबरोबरच खोत यांनी खासदार संजय राऊत यांचाही समाचार घेतला. संजय राऊत हे टाइम पास चॅनल असल्याचं ते म्हणाले.
□ मंत्रिमंडळाचा विस्तार न होण्यामागे अजित पवार
राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार न होण्यामागे अजित पवार हेच कारण असल्याचे सांगत ,अजित पवार यांचाच मुहूर्त अजून ठरत नाही. शपथविधी कधी घ्यायचा? हे नक्की झालं की मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सूचक विधान खोत यांनी केले आहे.