सोलापूर – नवीन उड्डाणपुलामुळे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जागा बदलण्यात येणार आहे. तर हे नव्याने होणारे स्मारक संभाजी नगरच्या धर्तीवर सोलापुरात व्हावे, अशी सोलापुरातील शिवभक्तांची अपेक्षा आहेत. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीची स्थापन केली आहे. A memorial should be made in Solapur on the lines of Sambhaji Nagar; Shiv devotees formed a Shiv Smarak Committee demand
सोलापुरातील विविध मंडळांशी संबंधित शिवभक्तांनी एकत्रित येवून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीची स्थापन केली असून आगामी काळात केवळ उत्सवापुरते नव्हे तर कायम स्वरूपी असे कार्य समितीच्यावतीनं केलं जाईल असं सांगण्यात आलं.
जुना पुणे नाका ते सात रस्ता उड्डाणपुलामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करावे, छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा बसवावा, जिल्हा आरोग्य केंद्राचे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब महिला रुग्णालय असे नामकरण करण्यात यावे यासह अन्य मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या.
राज्यात असलेले सरकार समितीच्या मागण्या मान्य करेल राज्यात असलेले सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहे, म्हणून समितीने केलेल्या या तीनही मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते, खासदार, आमदार यामध्ये लक्ष देऊन या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या मागण्या पूर्ण करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीत ११ पदाधिकारी व सदस्य म्हणून १०० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी निमंत्रक अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, अनंत जाधव, दास शेळके, सुनील रसाळे, दत्तात्रय मुळे, शेखर फंड, तुकाराम मस्के, प्रशांत इंगळे, विनायक महिंद्रकर, संजय शिंदे, शशी थोरात, हेमंत पिंगळे, बाळासाहेब पुणेकर, रवी मोहिते, राजू सुपाते, किरण पवार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
११ जणांच कार्यकारी मंडळ तर १०० मंडळांचे प्रतिनिधी या स्मारक समितीत असतील. दरवर्षी नवीन लोकांनाही संधी देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. सध्याच्या मध्यवर्ती उत्सव किंवा ट्रस्ट मंडळ या विषयी आमची कोणतीही तक्रार नाही. शिवभक्तांनी अधिकाधिक प्रेरणादायी काम करावा असा आमचा प्रयत्न राहील असं सांगण्यात आलं.
शहरात होणाऱ्या नवीन उड्डाणपुलामुळे शिवरायांच्या पुतळ्याची जागा बदलून सुशोभिकरण होणार आहे. संभाजी नगरच्या धर्तीवर हे स्मारक व्हावं अशी शिवभक्तांची इच्छा आहे. सिव्हील हॉस्पिटलला शिवरायांच्या नाव देण्यात आलयं मात्र तिथे शिवरायांचा पुतळा नाही, तो बसवावा. तसेच नव्यानं होत असलेल्या जिल्हा रुग्णालयास राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब महिला रुग्णालय असं नामकरण करावा हा अजेंडा नव्या स्मारक समितीचा आहे.
वर्षभर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पुतळा परिसर स्वच्छ करून नियमितपणे पुष्पहार अर्पण करणे हा उपक्रमही स्मारक समिती पार पाडेल असंही सांगण्यात आलं. पत्रकार परिषदेस अनेक मंडळाचे शिवभक्त उपस्थित होते.