● जीवनाची हमी उपक्रम : मुंबईत वेळेवर झाली शस्त्रक्रिया
अक्कलकोट : – जिल्हा परिषदेकडून जीवनाची हमी बालमृत्यू हे अभियान राबविले. या अभियानात एका मुलाच्या हृदयाला छिद्र असल्याचे आढळले. त्या मुलावर मुंबईतील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. वेळीच शस्त्रक्रिया व उपचार झाल्याने त्याचा जीव वाचला आहे. Two-and-a-half-year-old Prasad received a lifeline from Mindargi Primary Health Center through the campaign ‘Guaranteed Life, Reduce Child Mortality’
सोलापूर जिल्हा परिषदेने काही महिन्यांपूर्वी आरोग्य विभाग व महिला बाल कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सीईओ दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून ‘जीवनाची हमी, बालमृत्यू कमी’ हे अभियान सुरू केले होते. या अभियानात काही बालकांची वेळीच तपासणी व उपचार केल्याने त्यांचे प्राण वाचले.
अक्कलकोट येथील अंगणवाडी केंद्रातील आरोग्य तपासणीमध्ये प्रसाद गणेश विभुते (वय अडीच वर्ष रा. संभाजी चौक अक्कलकोट) या मुलाला हृदयदोष आढळला. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीरज जाधव, विनोद डांगे, आरोग्य सेविका स्वरूपा चव्हाण आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांनी दोन महिन्यांपूर्वी या मुलाची तपासणी केली होती.
प्रसाद यास मुंबई येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावरील हृदय शस्त्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली. आता प्रसाद ची तब्येत चांगली आहे. ही शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून मोफत झाली असून भायखळा बालाजी हार्ट हॉस्पिटल मुंबई येथील सर्व डॉक्टर्स व कर्मचारी यांच्या सहकार्याने शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली.
जागरूक बालक, सुदृढ बालक कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील बालक या बालाजी हॉस्पिटलमध्ये अँडमिट आहेत. त्याच्या नातेवाईकांना लागणाऱ्या कागदपत्राची माहिती व पूर्तीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मैंदर्गीच्या अधिपरिचारिका अलका विभुते मदत करीत आहेत.
अलका विभूते बालकांच्या पाल्यांना सहकार्य करून अडीअडचणी विचारून संबधित अधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्यामार्फत मार्गदर्शन करत आहेत. डॉ. द्वारकानाथ कुलकर्णी यांचे हे ऑपरेशन करण्यासाठी सहकार्य लाभले. शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडल्याने त्याबद्दल डॉक्टर द्वारकानाथ कुलकर्णी व समस्त बालाजी हॉस्पिटल ट्रस्टचे बालकांच्या नातेवाईक प्रा.आ. केंद्राच्या अधिपरिचारीका अलका विभुते (रुग्णाची अत्या) यांनी सर्व टीम चे आभार मानले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 कीर्ती भराडिया दुस-या विक्रमास सज्ज; समुद्रात सलग ५१ किलोमीटर पोहणार
● तयारीसाठी अरबी समुदात सराव
सोलापूर – मुंबईतील अरबी समुद्रात सलग ३८ किलोमीटर दिवसा पोहून विक्रम केलेल्या सोलापूरची जलकन्या कीर्ती भराडिया आता श्रीलंका ते भारत यादरम्यानच्या समुद्रात ५१ किलोमीटरचे अंतर रात्री पोहून दुसरा एक नवा विक्रम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती कीर्तीचे वडील नंदकुमार भराडिया यांनी दिली.
कीर्ती यासाठी येत्या मंगळवारी, २१ फेब्रुवारी रोजी मुंबईतील अरबी समुद्रातील धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे ३६ किलोमीटर अंतर पोहण्याचा सराव करणार आहे. यापूर्वी तिने ३८ किलोमीटरचे वरळी सी लिंक ते गेटवे ऑफ इंडिया हे अरबी समुद्रातील अंतर अवघ्या ७ तास २२ मिनिटात पोहून पूर्ण करत विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. आता पुन्हा ती श्रीलंका ते भारत (रामेश्वरम) या समुद्रातील ५१ किलोमीटरचे अंतर रात्री पंधरा ते सतरा तासात पोहून पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी तिने सरकारकडेही अर्ज केला असून मार्चमध्ये तिला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे कीर्ती आपले प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरातील मार्कंडेय तलावातही रात्रीच्या वेळी १ ते पहाटे ६ या वेळेत जागून व दुपारी १ ते सायंकाळी ५ यादरम्यान सराव करीत असल्याचे तिचे वडील भराडिया यांनी सांगितले. याचाच एक भाग म्हणून २१ रोजी अरबी समुद्रात आपल्या पुढील विक्रमाचा सराव करणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळेस सुदेश देशमुख, श्रीकांत शेटे, पार्वतय्या श्रीराम आदी उपस्थित होते.