मोहोळ : भाजपचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज राजन पाटील यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिलंय. राष्ट्रवादी ऐवजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवनिर्माण राष्ट्रवादाचा विचार वाढवण्यासाठी भाजपमध्ये या, अशी साद घातलीय. Come to Mohol, Chief Minister Pramod Sawant’s offer to Rajan Patal to join BJP, visit Pandharpur
सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते डॉ.प्रमोद सावंत यांनी मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी उपस्थित असलेल्या जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना एक प्रश्न आवर्जून विचारला की हे राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत, आपण भाजपचे गोव्याचे मुख्यमंत्री आहात. मग आपण यांच्या निवासस्थानी आपुलकीने आवर्जून भेटीला येण्याचं कारण काय ? यावेळी अत्यंत नम्रपणे, शांतपणे एकच उत्तर त्यांनी दिले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की “देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नवनिर्माण राष्ट्रवादाचा विचार वाढवण्यासाठी ज्येष्ठ नेते राजन पाटील यांनी भाजपमध्ये यावे ” हे विशेष आमंत्रण घेऊन मी यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी युवा नेते बाळराजे पाटील यांचे सकारात्मक आणि सुचक स्मितहास्य बरेच काही सांगून गेल्याचे उपस्थित नेत्याने सांगितल्याची माहिती आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवनिर्माण राष्ट्रवादाचा विचार वाढवण्यासाठी भाजपमध्ये या असे भाजपचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे माजी आ राजन पाटील यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आसलेले गोव्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते डॉ.प्रमोद सावंत यांनी मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते राजन पाटील यांच्या निवासस्थानी आज भेट दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी उपस्थित असलेल्या जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना अनेक दिवसापासून चर्चिला जाणार प्रश्न विचारलाच. राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत, आपण भाजपचे गोव्याचे मुख्यमंत्री आहात. मग आपण यांच्या निवासस्थानी आपुलकीने आवर्जून भेटीला येण्याचं कारण काय ? यावेळी अत्यंत नम्रपणे, शांतपणे एकच उत्तर त्यांनी दिले की “देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नवनिर्माण राष्ट्रवादाचा विचार वाढवण्यासाठी जेष्ठ नेते राजन पाटील यांनी भाजपमध्ये यावे ” हे विशेष आमंत्रण घेऊन मी यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
यावेळी पुत्र बाळराजे पाटील यांचे सकारात्मक आणि सुचक स्मितहास्य बरेच काही सांगून गेले. यानंतर राजन पाटील प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की मतदार संघातील सर्व कार्यकर्ते व मतदारांना विश्वासात घेऊनच पक्ष प्रवेशा बाबत निर्णय घेतला जाईल, यावेळी राजन पाटील यांच्या मातोश्री निवासस्थानी बाळराजे पाटील अजिंक्यराणा पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांच्या सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
● पुन्हा एकदा मोदींचे सरकार येऊ श्री विठ्ठल रुक्मिणीला साकडे – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पंढरपूर : गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे आज पंढरपूर मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळेस 2024 मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदीचे सरकार येऊ श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी साकडे घातले.
महाराष्ट्रात भाजपमध्ये कोणाला प्रवेश द्या कोणाला घ्या यासाठी मी कुणाला बोललो नाही, किंवा त्यासाठी आलोही नाही, परंतु माझ्या इथे येणे जर भाजपला फायदा होणार असेल तर मला ते आवडेल. गोव्यामधील भाविक ही पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने आम्हाला पंढरपूर मध्ये जागा उपलब्ध करून दिली तर या ठिकाणी गोवा भवन उभारण्याचा प्रयत्न करतो.