○ काल कॉलेजला गेलेली मुलगी घरी आलीच नाही
सोलापूर : सोलापूरच्या कवठे येथे एकाच झाडाला गळफास घेत प्रेमीयुगुलाने आयुष्य संपवले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. Khuneshwar Mohol Kavthe ended his life by hanging himself from the same tree सुरज चव्हाण असे तरूणाचे नाव असून तो मोहोळ तालुक्यातील रहिवासी आहे. मृत मुलगी ही अल्पवयीन आहे. ही मुलगी मागील वर्षी मोहोळ तालुक्यात आपल्या मामाच्या गावी गेली होती. त्यावेळी सूरज आणि तिच्यात प्रेम जुळले. कुटुंबातून याला विरोध झाला. दरम्यान, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
सुरज कुंडलीक चव्हाण (वय २५) असं यातील युवकाचं नाव असून युवती अल्पवयीन आहे. दोघांच्या लग्नास घरच्यांचा विरोध होता, त्यातूनच हा प्रकार घडल्याचा प्राथमिक माहिती आहे. मात्र याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
अल्पवयीन तरूणी ही काल शुक्रवारी (ता.24) सकाळी महाविद्यालयात गेली होती. रोजच्या प्रमाणे दुपारी घरी येईल अशी अपेक्षा होती. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी परत आलीच नाही. तरूणीच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आधी नातेवाईकांकडे शोधा, २४ तासानंतर गुन्हा दाखल करु, असा सल्ला पोलिसांनी दिला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अखेर आज शनिवारी सकाळी कवठे गावच्या शिवारात या प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दोघांचे नातेवाईक शासकीय रुग्णालयात दाखल झाले असून शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी सोलापूर शहरानजीकच्या गावातील महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत होती. तर मुलगा सुरज चव्हाण हा मोहोळ तालुक्यातील खुणेश्वर या गावातील रहिवासी असून तो चिंचोळी एमआयडीसीमधील एका कंपनीत नोकरी करत होता.
● मामाच्या गावी गेल्यानंतर जुळले प्रेम
वर्षभरापूर्वी अल्पवयीन तरूणी मामाच्या गावात सुट्टीसाठी आली होती. त्यावेळी खुणेश्वर गावातील सूरज चव्हाणसोबत तिचे प्रेमसंंबंध जुळले. मात्र संबंधांची चाहूल लागताच मुलीला परत आई-वडिलांकडे पाठवण्यात आले होते.
पण त्यानंतरही दोघांमधील प्रेमसंबंध पुढे चालू राहिले. दोघांनीही घरी लग्नाबाबत चर्चा सुरु केली. त्यावेळी अल्पवयीन तरुणीच्या आई-वडिलांनी सूरजसोबत लग्नाला विरोध केला होता. तरूणीच्या वडिलांनी आणि काकांनी खुणेश्वरमध्ये जाऊन बैठक घेत लग्नास नकार दिला. सुरजच्या घरची परिस्थिती बेताची आहे. गावात राहण्यासाठी फक्त पत्राच्या शेड आहे. परिणामी तरुणीच्या कुटुंबियांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला होता. परंतु दोघांनीही हट्ट धरल्यामुळे तरुणीची समजूत काढत आधी शिक्षण पूर्ण कर, वयात आल्यावर विचार करु असा सल्ला दिला होता. त्यानंतर ही घटना घडली.