पुणे : कसबा पेठ येथील निकाल जाहीर झाला आहे. या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर विजयी झाले आहेत. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. रासने यांनी आपला पराभव मान्य केला आहे. मतमोजणीच्या सर्व 20 फेऱ्या संपल्या आहेत. धंगेकर यांना 72599 आणि रासने यांना 61771 मते मिळाली आहेत. The result of the hotly debated Kasba Peth by-election announced; Ravindra Dhangekar’s historic victory for Congress
पहिल्या दिवसापासूनच वादात सापडलेल्या आणि चर्चेत असलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर हाती आला आहे.कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.
कसबा पेठ येथे मतमोजणीच्या 15 व्या फेरीनंतर काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांनी तब्बल 6 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांना आतापर्यंत 56497 मते मिळाली आहेत. तर भाजपचे हेमंत रासने यांनी 50490 मते घेतली आहेत. आता मतमोजणीच्या फक्त 5 फेऱ्या शिल्लक आहेत. त्यामुळे आपलाच विजय होणार, असे स्पष्ट करत रविंद्र धंगेकर यांनी कार्यकर्त्यांसोबत विजयी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
कसबा पेठ येथील विधानसभा पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर यांनी तब्बल 5285 मतांनी आघाडी घेतली आहे. या ठिकाणी मतमोजणीच्या 14 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. धंगेकर यांनी आतापर्यंत 52831 मते घेतली आहेत. तर हेमंत रासने यांना 47546 मते मिळाली आहेत. त्यामुळे धंगेकर यांनी आपला विजय निश्चित असल्याचे स्पष्ट केले आहे. आता मतमोजणीच्या फक्त 6 फेऱ्या शिल्लक आहेत. हा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता.
कसब्यात मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या पेठांमधील मतमोजणी पूर्ण झाल्यावर देखील कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आघाडीवर होते. हे अनपेक्षित आणि कसब्याच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच घडलं असेल. सदाशिव पेठ, नारायण पेठ, आणि शनिवार पेठेत भाजपच्या हेमंत रासनेंना आघाडी मिळाली खरी, मात्र ती रवींद्र धंगेकरांना पिछाडीवर टाकण्यास फारशी उपयोगी पडली नाही. रासनेंना मिळालेली आघाडी धंगेकरांना मिळालेल्या कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ इथल्या आघाडीवर मात करु शकली नाही. अखेर भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसने हिसकावून घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा हा मोठा विजय असल्याचं बोललं जात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
कसब्यात भाजपाचा विजय हा नेहमी शिवसेनेच्या पाठिंब्यानेच होत आला. आज शिवसेना मविआचा घटक आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. त्याचा परिणाम तिथे दिसतोय. चिंचवडमध्ये तर भाजपाला शेवटपर्यंत घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. तिथे तिरंगी लढत आहे. आम्ही अपेक्षा ठेवून आहोत, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
● ‘उमेदवार म्हणून मी कमी पडलो’
उमेदवार म्हणून मी कमी पडलो, त्यामुळे माझा पराभव होताना दिसत आहे, हा पराभव मी विनम्रपणे स्वीकार करतो, असे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी म्हटले आहे. कसबा येथे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना निर्णायक अशी 10 हजारांपेक्षा जास्त आघाडी मिळाली आहे. येथे 17 फेऱ्या संपल्या आहेत. अजून मतमोजणीच्या 3 फेऱ्या शिल्लक आहेत. धंगेकर यांना आतापर्यंत 67953 आणि हेमंत रासने यांना 58905 मते मिळाली आहेत.
● पिंपळे गुरव परिसरात लागले फ्लेक्स
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप या आघाडीवर आहेत. त्यातच आता त्यांचे आमदार असा उल्लेख असलेले फलक पिंपळे गुरव परिसरात लागले आहेत.
अकराव्या फेरीपर्यंत भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप या 8564 मतांनी आघाडीवर होत्या. दरम्यान, अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आपण लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.