सोलापूर : सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला गर्भवती केल्याने, त्या बाळाशी डीएनए जुळल्याने आरोपीला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता शिरभाते यांनी सुनावली. Even though the victim, the Panch Fitur, the accused was sentenced to seven years of hard labor by the Court of Solapur
फट्या ऊर्फ नागेश नारायण राऊत (वय २४, रा. मोहोळ) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.आरोपीने पीडितेशी ओळख करून घेतली. त्यानंतर त्याने पीडितेला जबरदस्तीने ओढ्यात नेऊन अत्याचार केला. दरम्यान, पीडित ही गर्भवती झाली. यामुळे पीडितेच्या आईने दवाखान्यात दाखविल्यानंतर ती डॉक्टरांनी गर्भवती असल्याचे सांगितले.
दरम्यान, पीडितेने २०१७ मध्ये सिव्हिल हॉस्पिटल येथे मुलीला जन्म दिला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश जिल्हा व सर्व न्यायाधीश कविता शिरभाते यांच्या कोर्टात झाली. यात सरकार पक्षातर्फे आरोपीने पीडितेवर शारीरिक अत्याचार केल्याचे डी. एन. ए. अहवालाद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
या प्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने सहा. सरकारी वकील ॲड. प्रकाश जन्नु, ॲड. शीतल डोके, ॲड. माधुरी देशपांडे, तर आरोपीच्यावतीने ॲड. भारत कट्टे यांनी काम पाहिले. प्रकरणाचा तपास सहा. पोलिस निरीक्षक बी. बी. जाधव यांनी केला, तर कोटी पैरवी म्हणून भोसले व पवार यांनी काम पाहिले आहे.
सरकारी पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे पीडितेचा उलट तपास व तपासी अंमलदार यांची साक्ष महत्त्वपूर्ण होती. पीडिता, पीडितेची आई यांनी सरकार पक्षास मदत न करता फितूर झाली. डी. एन. ए. रिपोर्टनुसार आरोपी हा पीडितेला झालेल्या मुलीचे वडील असल्याचे सरकारी वकील यांनी युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी नागेश राऊत यास ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. शिवाय ५ हजारांचा दंड व दंड न भरल्यास ७ महिन्याची कैदेची शिक्षा सुनावली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 रस्त्याच्या कडेला उभारणे शेतक-याच्या जीवावर बेतले , नागरिकांनी मोठमोठ्याने ओरडूनही उपयोग झाला नाही
सोलापूर : रस्त्याच्या कडेला थांबणे एका वृद्ध शेतकऱ्याच्या जीवावर बेतले आहे.आनंदा विश्वनाथ गरड (वय 67 वर्ष, रा. रानमसले, ता. उ. सोलापूर) असे या मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मळी वाहतूक करणाऱ्या टँकरने त्यांना जोरदार धडक दिल्याने त्यांना शेतक-याचा मृत्यू झालाय. या अपघाताप्रकरणी मळी टँकर चालकाच्या विरोधात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुरूवारी (ता.2) सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी टँकरचालकाविरोधात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुरूवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम दयानंद गरड (वय २८) याने दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश अर्जुन सेनमारे (वय ३४, रा. नरखेड, ता. मोहोळ) या टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लोकरे हे करीत आहेत. आनंदा विश्वनाथ गरड (वय ६७, रा. रानमसले, ता. उ. सोलापूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मयत आनंदा गरड हे रानमसले-बीबीदारफळ रोडवर रस्त्याच्या कडेला थांबले होते. याचवेळी टँकरचालकाने आनंदा गरड यांना धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले.
त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येेथे दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली असून अधिक तपास सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. मयत आनंदा गरड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, भाऊ, भावजय, नातवंडे असा परिवार आहे.
अपघात झाल्यानंतर १०० मीटरपर्यंत टँकरचालक तसाच पुढे निघून जात होता. नागरिकांनी मोठमोठ्याने ओरडून त्याला थांबविले. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी अपघातात जखमी झालेल्या आनंदा गरड यांना उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाले. घटनेनंतर संतप्त जमावाने टँकरच्या काचा, हेडलाईट फोडून संताप व्यक्त केला.