रत्नागिरी : एकनाथ शिंदे यांनी आता अमित शाह यांना वडील म्हटलंय, त्यामुळे ते आता आपली संपत्ती चोरणार का याची चिंता जय शाह यांना लागली आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. तुम्हाला पक्षप्रमुख म्हणून कोण हवंय… मी की मिंधे असा सवालही त्यांनी विचारला. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे रत्नागिरीतील खेड या ठिकाणी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर तुफान टीका केली. Uddhav Thackeray’s strong verbal ‘Golibar’ on Shinde group public meeting in Ratnagiri village
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रत्नागिरीच्या खेडमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे सभा स्थळी दाखल झाले आहेत. या विराट सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. कार्यकर्त्यांची फळी मजबुत करण्याच्या हेतूने शिवगर्जना यात्रा काढण्यात आली आहे. कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. उद्धव ठाकरेंच्या सभेने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला.
उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर जोरदार ‘गोळीबार’ केला आहे. मला निवडणूक आयोगाला सांगायचे आहे की, ही आहे खरी शिवसेना. निवडणूक आयोग हा चुना लगाओ आयोग आहे. होय, मला निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही. मी शिवसेनाच म्हणणार आहे. धनुष्यबाण चोरणाऱ्यांना गोळीबार करण्याची गरज नाही. ते असेच चिरडले जातील असे टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरेंच्या खेड मधील सभेला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली.
माजी आमदार संजय कदमांचा ठाकरे गटात प्रवेश उद्धव ठाकरे यांची आज खेडमध्ये सभा झाली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचा ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे. त्यांच्यासह यावेळी राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्तेही होते. दरम्यान, ‘एकनाथ भाऊ कसब्यात ठाकरेंनी दोनच मिनिट ऑनलाईन सभा घेतली. तर विजय झाला आता ते महाराष्ट्र दौरा करीत आहेत 40 आमदारांचे डिपॉझीट जप्त होईल,’ अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, कानडी मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले आणि हे गप्प बसले. एक काळा टोपीवाला होता, त्याने शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला, त्यावेळी हे शेपट्या घालून बसले. तुमचा अर्धा वेळ फिरण्यामध्ये जातोय, अर्धा वेळ दिल्लीला मुजरा करायला आणि अर्धा वेळ ज्यांना खोकी मिळाली नाहीत, मंत्रीपदं मिळाली नाहीत त्यांना सांभाळायला जातो.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शिवसेना नावाशिवाय, बाळासाहेबांच्या नावाशिवाय फक्त मोदींच्या नावाने महाराष्ट्रात मतं मागून दाखवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी दिलं. तुमच्यात जर धमक असेल तर चोरलेलं धनुष्यबाण घेऊन या, मी माझी मशाल घेऊन येतो, बघुया कोण जिंकतंय? 2024 ची निवडणूक ही शेवटची संधी असेल. या निवडणुकीत जर पुन्हा भाजप आलं तर देशातील लोकशाही संपणार, त्यानंतर लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही. त्यानंतर देशात संपूर्ण हुकूमशाही येईल.
आजपासून भाजप आणि शिंदे मुंबईत आशीर्वाद यात्रा काढतात, चोरांना तुम्ही आशीर्वाद देणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. मेघालयात ज्या संगमांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या मुलासोबत सत्तेसाठी गेले, दुसऱ्यांवर घराणेशाहीचे आरोप करायचे आणि आपण मात्र उलटच वागायचं. यांनी आपलं चिन्ह चोरलं, पक्ष चोरलं राज्यातल्या जनतेनं ठरवायचं आहे की शिवसेनाप्रमुख म्हणून मी हवाय की मिंधे हवेत. त्यांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरलं पण ते शिवसेना चोरू शकणार नाहीत. हातात धनुष्यबाण घेतायत, पण कपाळावर लिहिलेलं गद्दार पुसलं जाणार नाही. जो कुटुंब बदलतो, तो राज्य काय बदलणार, असा प्रतिसवाल कैला.
□ उद्धव ठाकरे खेडमधील सभेतून म्हणाले…..
– निवडणूक आयोगाने चोंबडेपणा करू नये. –
– स्वातंत्र्य लढ्यात कुठेच नसणारे त्याबद्दल बोलताय.
• देशाचे स्वातंत्र्य आज धोक्यात.
कदाचित 2024 ची शेवटची निवडणूक असेल.
– तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे फक्त विश्वास.
देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडू.
– गोमुत्र शिंपडून देश स्वातंत्र्य झाला नाही.
– हा राजकीय वांझोटेपणा
– सर्वात जास्त भ्रष्टाचारी भाजपमध्ये.
– भाजपच्या व्यासपिठावर आधी साधू, आता संधीसाधू.
• सरकार चांगले चालले होते. –
– कसब्यामध्ये साफ झाले, अंधेरीत लढायची हिंम्मत नव्हती.
– दिवस फिरल्यावर विचार करा.
– यांना देश संपवायचा आहे.
– शिवसेना प्रमुख आणि हिंदू हृदयसम्राट एकच.
– तुम्हाला मिंधे पक्षप्रमुख म्हणून चालेल का?
– कोकणाने शिवसेनेला 100% यश दिले.