● तत्कालीन सीईओ त्रिंबक ढेंगळे – पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी
● पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी दिले आदेश
सोलापूर : सोलापूर ते उजनी दुहेरी जलवाहिनी कामकाज संदर्भात कोणत्याही प्रकारचा ठोस असा निर्णय झालेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या बैठकीत झालेला नाही. There is no concrete decision in the meeting of the Guardian Minister regarding the work of double water channel Solapur Radhakrishna Vikhe-Patil दरम्यान, सोलापूर ते उजनी दुहेरी जलवाहिनी कामकाज संदर्भात पोचमपाड” कन्ट्रक्शन कंपनीने लवादाकडे लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (कोल्हापूर ) ला प्रतिवादी करण्याची विनंती केली असून यासंदर्भात त्या संदर्भात कायदेशीर बाबी तपासण्या करिता अनुभवी सॉलिसिटर यांचा अभिप्राय घ्यावा तसेच तत्कालीन सीईओ त्रिंबक ढेंगळे – पाटील यांच्यावर मंत्रालय स्तरावर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे आदेश पालकमंत्री विखे – पाटील यांनी दिले आहेत.
सोलापूर ते उजनी दुहेरी जलवाहिनी कामकाज संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीस खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान अवताडे, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर, महापलिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकरी अधिकारी शीतल तेली- उगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी,स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सोलापूर ते उजनी दुहेरी सामंतर जलवाहिनी कामकाज संदर्भात चर्चा करण्यात आली. ही पाईप लाईन पूर्वी 110 एमएलडी वरून 170 एमएलडी करण्यात आले. या योजने अंतर्गत सोलापूर शहरास दररोज 170 एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेत मुख्यत्व धरण क्षेत्रात जॅकवेल , पपिंग मशीनरी,रायझिंग मेन, बी. पी.टी, ग्राविटी मेन इत्यादी कामाचा समावेश आहे. योजनेचा खर्च एकूण 894.99 कोटी रुपये आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान, पहिला मक्तेदार पोचमपाड कन्ट्रक्शन कंपनी लवादा मध्ये गेले आहेत. पुणे येथे लावादाची प्रक्रिया सुरु आहे. पोचमपाड कंपनीने लवाद साठे यांच्याकडे दि. 24 जानेवारी 2023 रोजीच्या पत्राद्वारे यामध्ये दुसरा मक्तेदार लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (कोल्हापूर ) यांना प्रतिवादी (रिस्पॉडन्ट) म्हणून मान्यता देण्यास विनंती केली आहे, अशी माहिती पालकमंत्री यांना देण्यात आली होती. त्या संदर्भात कायदेशीर बाबी तपासण्या करिता अनुभवी सॉलिसिटर यांचा वैधानिक अभिप्राय घेण्यात यावा. तसेच तत्कालीन सीईओ त्रिंबक ढेंगळे – पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई मंत्रालय स्तरावर करण्यात यावी,असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी दिले आहेत.
दरम्यान यंदाच्या ही पालकमंत्री विखे पाटील यांच्या दौऱ्यात उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे हे काम जैसे थे राहणार आहे. लवादाच्या प्रक्रियेत हे प्रकरण आता अडकले आहे. उजनी- सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम थांबविल्याप्रकरणी तत्कालीन सीईओ ढेंगळे पाटील यांना नोटीस बजवण्याच्या आदेश यापूर्वीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी दिले होते. तर आज झालेल्या बैठकीत मंत्रालय स्तरावर तत्कालीन सीईओ त्रिंबक ढेंगळे – पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. यावरून पुन्हा केवळ चर्चाच झाली असल्याचे दिसून येते.