□ कॉपीप्रकरणी संचालकासह 8 जणांवर गुन्हा
मुंबई : राज्यभरात गाजलेल्या इयत्ता बारावीचा गणित पेपर सोशल मीडियाद्वारे फुटल्याची घटना तीन मार्च रोजी बुलढाण्यातील सिंदखेड राजा तालुक्यात घडली. या प्रकरणाचा व्यवस्थित तपास करण्यासाठी एसआयटी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. Investigation of 12th Maths paper leak case to SIT; Buldhana students in police custody heard from two teachers याप्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. काल अटक केलेल्या दोन आरोपी शिक्षकांना 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दहावी आणि बारावी बोर्डाच्या परिक्षेमध्ये दररोज कॉपीची प्रकरणे समोर येत आहेत. आता कॉपी प्रकरणात यवतमाळच्या काटखेडा येथे उच्च माध्यमिक विद्यालयाच्या केंद्र संचालकांसह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी विद्यालयात अचानक जाऊन पोतेभर कॉपी जप्त केली होती. बिनधास्त कॉपी करू दिल्याबद्दल त्यांनी संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
इंग्रजी विषयांमध्ये प्रश्न आयोजित उत्तर छापून दिल्याने शिक्षण विभागाला सहा गुण विद्यार्थ्यांना द्यावे लागत असताना. त्या पाठोपाठ आता बारावी च्या गणित सारख्या महत्त्वाच्या विषयाची फेर परीक्षा घेण्या करता शिक्षण मंडळाला विचार करावा लागतो का याकडे सर्व लक्ष लागले आहे. एकंदरी आता हा तपास एसआयटी मार्फत होणार असल्याने या पेपर फुट प्रकरणाचे मुख्य सूत्रधार पर्यंत कशा पद्धतीने आणि तेही कमी वेळामध्ये पोहोचल्या जाते हा सुद्धा एक त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न असेल. जे आरोपी आतापर्यंत ताब्यात घेतले आहे त्यामध्ये काही खाजगी शिक्षण संस्थातील शिक्षक देखील आहे. त्याच परिसरातील काही इसम कार्यरत आहेत. नेमका कसा हा व्हाट्सअप ग्रुप तयार झाला आणि त्याचे कनेक्शन मुंबई पर्यंत देखील सापडल्याचे पोलीस सूत्रांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अतिशय गोपनीय पद्धतीने हा सर्व पेपर फुटी प्रकार गृह विभागाकडून हाताळला जात असून संपूर्ण राज्य सरकारची शिक्षण विभाग खळबडून जागे झाले आहे. सुरुवातीला अतिशय हलक्यात घेणाऱ्या या पेपर फुटीला आता एसआयटीकडे वर्ग करण्यात येत असल्याने याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे .निश्चित यामध्ये काहीतरी मोठे रॅकेट सक्रिय असू शकते का? हा शोध घेतला जाईल.
बुलढाण्याच्या सिंदखेडराजामध्ये 3 मार्च रोजी झालेल्या गणिताच्या पेपरची प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आतापर्यंत 5 जण अटकेत होते. त्यात आणखी 2 शिक्षकांच्या अटकेने भर पडली असून ही संख्या 7 वर गेली आहे. शेख अकिल आणि अंकूश चव्हाण अशी अटक केलेल्या दोन शिक्षकांची नावे आहेत. ते लोणार तालुक्यातील रहिवासी आहे. या प्रकरणाने राज्याचे लक्ष वेधले होते.
बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पेपर फुटल्याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून यात दोन शिक्षकांचा समावेश आहे. दरम्यान, मुंबईत बारावीची गणिताची परीक्षा सुरू होण्यापूर्वी जवळपास पाऊणतास विद्यार्थ्यांना मोबाईलवर प्रश्नपत्रिका मिळाल्याचे समोर आले आहे. बारावीच्या गणिताची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर पाठवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज (5 मार्च) नगरमधून एका संशयीताला ताब्यात घेतले. दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेच्या तक्रारीवरून याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पेपर सुरु होण्याच्या अर्धा तासापूर्वी गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात दोन शिक्षकांसह जवळच्या गावातल्या तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पेपरफुटी प्रकरणातला मुख्य सूत्रधार अद्यापही पोलिसांना सापडला नाही. पोलीस त्याचा तपास घेत आहेत.
राज्यात अर्थसंकल्प अधिवेशन सुरु असताना, पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधारी शिंदे आणि फडणवीस सरकारला घेरले होते. यावेळी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर विधीमंडळातील गोंधळानंतर सरकारने •पेपरफुटीप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांनी पेपरफुटीप्रकरणी . सिंदखेडराजा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
बुलढाण्यात बारावीचा पेपर फुटल्याप्रकरणी दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पेपर फुटीसाठी व्हॉट्सअॅपचा वापर करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. 99 जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवून त्यामध्ये पेपर लीक केल्याचं उघडकीस आलं आहे. आरोपींनी व्हॉट्सॲप ग्रुप बनवून कॉपी केली. परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी दहा ते बारा हजार रुपये घेतले जात असल्याचेही म्हटले जात आहे. आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.
बारावी गणिताच्या विषयाच्या पेपराचे पडसाद विधानसभेमध्ये उमटले होते. आता त्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास SIT मार्फत तपास करण्यात येणार आहे. आतापर्यंत या प्रकरणांमध्ये सात आरोपींना ताब्यात घेतले असून काल पकडलेल्या दोन्ही आरोपी शिक्षकांना 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.