पंढरपूर : ग्राम स्वच्छतेद्वारा गोळा केल्या जाणाऱ्या केर कचऱ्याची आधुनिक होळी सलग 28 व्या वर्षी अक्षरांगण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घालमे पवार वस्ती येथे साजरी झाली. Modern Holi of Kerakchara in Pandharpur; Gram Swachhta Zilla Parishad Primary School appeal not to throw poli during Holi
प्राथमिक शिक्षण प्रशांत वाघमारे यांच्या संकल्पनेतुन ही होळी साजरी करण्यात येते. यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नवनाथ पोरे, केंद्रप्रमुख ल.पा. कांबळे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष; उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. यावेळी ग्राम स्वच्छतेद्वारे गोळा होणाऱ्या केर कचऱ्यातून प्लास्टिकचे कागद वेगळे करण्यात आले व जमिनीत गाढण्यात आले. कंपोस्ट खतासाठी आवश्यक उपयुक्त असणारा केर कचरा वेगळा काढण्यात आला. उर्वरित केरकच-याचे विधीवत पूजा करून आधुनिक होळी साजरी करण्यात आली.
आमदार समाधान आवताडे, आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, डॉ. बाबासाहेब देशमुख, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, जि प सदस्य नानासाहेब गोसावी, पंचायत समिती सदस्य पल्लवी यलमार, शिक्षणाधिकारी संजय जावीर, गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, विस्तार अधिकारी मारुती लिगाडे, सरपंच डॉ. संतोष साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी या कुणाच्या अनोख्या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या आधुनिक केरकचऱ्याच्या होळीची संकल्पना प्रशांत वाघमारे यांनी सांगितली. यावेळी होळीमध्ये लाकूड फाटा न जाळण्याचे आवाहन शुभम साळुंखे यांनी केले. सर्वांना केर कचऱ्याची होळी करण्याची प्रतिज्ञा संग्राम पवार यांनी दिली. निसर्ग संवर्धनाची महत्त्व अजिंक्य घालमे याने सांगितले. स्नेहल घालमे हिने अनिष्ट रूढी परंपरा व अंधश्रद्धा न पाळण्याचे आवाहन केले. होळीमध्ये पोळी न टाकण्याचे आवाहन काजल जाधव हिने केले. वातावरणातील बदलाची माहिती आदिती पवार हिने दिली व उन्हाळ्यात घ्यावयाच्या काळजीचे महत्त्व सांगितले.
यावेळी पत्रकार नवनाथ पोरे यांनी प्रशांत वाघमारे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. केंद्रप्रमुख ल.पा. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना होळीचे महत्त्व, अनिष्ट रूढी परंपरा या विषयी माहिती दिली देऊन सर्वांचे अभिनंदन केले. आभार शिक्षक दशरथ काटकर,भरती बनसोडे यांनी मानले.
सलग 28 व्या वर्षी साजऱ्या होणाऱ्या ग्राम स्वच्छते द्वारा गोळा होणाऱ्या केरकचऱ्याच्या या होळीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी आता अशा प्रकारच्या होळ्या होत आहेत.