मुंबई : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे आज गुरुवारी (9 मार्च) पहाटे निधन झाले. याबाबत माहिती देताना त्यांचे जवळचे मित्र अनुपम खेर यांनी लिहिले आहे की, 45 वर्षांची मैत्री आज पूर्णत: थांबली आहे. सतीशशिवाय आयुष्य पुन्हा पूर्वीसारखे होणार नाही. Actor Satish Kaushik passes away; Anupam Kher became more popular in comedy roles in Mr. India
सतीश कौशिक हे गुडगाव येथील एका फार्महाऊसवर एका मिटिंगसाठी गेले होते. फार्म हाऊसवरून परतत असताना सतीश कौशिक यांना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना गुडगावच्या फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले होते. उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सतीश कौशिक यांनी 1983 मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.
विनोदी भूमिकांना तोड नव्हती. गंभीर भूमिका करणारा अभिनेता ते हास्य अभिनेता अशी सतीश कौशिक यांची ओळख होती. शिवाय ते दिग्दर्शकही होते. आणि अनेक सिनेमांचे निर्मातेही होते. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 मध्ये झाला. हरियाणाच्या महेंद्रगड येथे त्यांचा जन्म झाला होता.
प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे आज पहाटे निधन झाले. सतीश कौशिक यांची मिस्टर इंडियातील भूमिका सर्वाधिक गाजली. त्यांना दोन वेळा बेस्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळालेला आहे. अभिनेता गोविंदासोबतचा त्यांचा कॉमेडीचा टायमिंग अफलातून असायचा. त्यांच्या छोट्या भूमिकाही प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहायच्या. त्यांच्या विनोदी भूमिका अधिक गाजल्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अनुपम खेर आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, मला माहित आहे ‘मृत्यू हे या जगाचं शेवटचं सत्य आहे!’ पण मी माझा जिवलग मित्र सतीश कौशिकबद्दल असं लिहीन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. ४५ वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम! ओम शांती! या ट्विटसोबतच त्यांनी अभिनेत्यासोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे.
जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! 💔💔💔 pic.twitter.com/WC5Yutwvqc
— Anupam Kher (@AnupamPKher) March 8, 2023
विशेष बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वीच सतीश कौशिक यांनी सर्वांसोबत होळी खेळली होती. सिने कलाकार आणि चित्रपसृष्टीतील इतर लोकांसोबत खेळलेल्या या होळीचे सर्व फोटो त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्टही केले होते. अशात अचानक झालेल्या त्यांच्या निधनाने चाहत्यांसोबतच सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी हा मोठा धक्का आहे.
सतीश कौशिक हे हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते होते. ते मुख्यतः मिस्टर इंडिया चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात, ज्यामध्ये त्यांनी कॅलेंडरची भूमिका केली होती. सतीश यांना दोनदा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
सतिश कौशिक यांनी आपल्या करीअरची सुरुवात 1983मध्ये आलेल्या “जाने भी दो यारो” या सिनेमातून केली होती. त्यानंतर त्यांनी 100हून अधिक सिनेमात काम केलं. 1993मध्ये त्यांनी रुप की रानी चोरों का राजा या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर त्यांनी डझनभर सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. मात्र, त्यांच्या विनोदी भूमिका अधिक गाजल्या. सतीश कौशिक यांची मिस्टर इंडियातील भूमिका सर्वाधिक गाजली.