पंढरपूर : कोणतेही वैद्यकीय पदवी नसताना आपण डॉक्टर आहे असे भासवून चुकीच्या पद्धतीने उपचार करून रुग्णांना फसवणाऱ्या बंगाली डॉक्टरला पंढरपूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती बनसोड यांनी दोन वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे. Bogus doctor in Pandharpur sentenced to two years imprisonment Court News
पंढरपूर तालुक्यातील तुंगत या गावात विबास उर्फ विभास विरेन रॉय हा वैद्यकीय महाविद्यालयाची पदवी नसताना तसेच वैद्यकीय व्यवसायाचे कायदेशीर ज्ञान नसताना आणि इंडियन मेडिकल कौन्सिल नोंदणी नसताना आपण डॉक्टर आहे असे भासवून रुग्णाकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करून त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार करून बेकायदेशीर रित्या वैद्यकीय व्यावसाय करून जनतेच्या आरोग्यास व जीवितास धोका निर्माण करीत असताना पोलिसांना सापडला होता. त्याच्यावर 419, 420 तसेच इंडियन मेडिकल कौन्सिल आणि इतर कायद्यान्वये पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
उपविभागी पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास हा सहाय्यक फौजदार अशोक जाधव यांनी करून न्यायालयात बोगस डॉक्टर विरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते.
या प्रकरणांमध्ये एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले आहेत आणि सहकारी वकील के एस देशमुख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने बोगस डॉक्टर विबास उर्फ विभास विरेन रॉय रा. पश्चिम बंगाल याला विविध कलमांतर्गत दोन वर्षाची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 मोहोळ । पोखरापुरात मंदिराजवळ समाधी अवस्थेत आढळला प्राचीन सांगाडा
मोहोळ : पोखरापूर (ता. मोहोळ ) येथे जगदंबा मंदिराजवळ समाधीस्त अवस्थेत मानवी सांगाडा मिळून आला असून ती समाधी कोणाची ? तेथे भूयार आहे काय ? कोणत्या महाराजांची समाधी आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राष्ट्रीय महामार्गाच्या संपादित क्षेत्रात प्राचीन जगदंबा देवीचे मंदिर पुनरोपन करण्याचे काम शासनाच्या पुरातत्व विभागाच्या वतीने युद्धपातळीवर हाती घेण्यात आलेले आहे. मंदिर परिसरात उत्खनन करत असताना एका समाधीच्या खाली दगडी बांधकामाच्या खोलीत प्राचीन मानवी सांगाडा आढळून आला आहे, त्यामुळे सदरचा मानवी सांगाडा हा प्राचीन स्वामीची संजीवन समाधी आहे का, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
याशिवाय बाजूला खोली आहे की त्या भागातून भुयार आहे हे अद्याप समजले नाही. यापुढील उत्खनन थांबवण्यात आले असून प्राथमिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यामुळे ते आल्यानंतर पुढील उत्खनन करण्यात येणार असल्याचे तेथील पुरातन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्या ठिकाणी नेमके काय काय आहे याबाबत चर्चा होत आहे.
काहींच्या अंदाजावरून तो सांगाडा तेथील महाराजांची समाधी असावी व ती सात ते आठशे वर्षांपूर्वीच्या असावी अशीही चर्चा सुरू आहे. काहींच्या मते बांधकाम खेड्यांमधील दिसून येत आहे. त्यामुळे शंभर वर्षाच्या पूर्वीच्या असावा असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. ही समाधी पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक येऊन पाहून जात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. याविषयी परिसरातील नागरिकांचे कुतूहल वाढत आहे