• 1 कोटी 20 लाख 50 हजार रुपयांची वाहाने जप्त कामती पोलिसांची कामगिरी
विरवडे बु : लोकांना विश्वासात घेऊन एक-दोन नव्हे तब्बल 25 वाहने गायब करणाऱ्या आरोपीस कामती पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून एक कोटी 20 लाख रुपयांची वाहने जप्त केली. ओळखीचा फायदा घेत गाड्या चोरल्याचे समोर आले आहे. 25 Car Hijacking Accused Gajaaad, Read How To Steal Cars Kamati Police Performance
मोहोळ तालुक्यातील कामती पोलीस स्टेशनच्या हद्दीत हाराळवाडी येथे राहणारा गणेश हिंदुराव माडकर हा सोलापूर येथे कामाला होता. तो गावी परत आल्या नंतर गावातील तसेच जवळच्या भागातील ज्या नागरिकाकडे चार चाकी वाहने आहेत, आशा लोकांना विश्वासात घेऊन मला फिरला जाण्यासाठी गाडी पाहिजे असे सांगून चार चाकी वाहन घेत असे मात्र ते वाहन परत न करता त्याचे परस्पर अपहरण करित होता.
याचं दरम्यान आरोपीने कोरवली (ता मोहोळ) येथील शरद सुरेश पवार यास विश्वासात घेऊन त्यांच्याकडून चार चाकी गाडी (क्रमांक एम एच 13 डी टी 2402) हे वाहन 22 फेबुवारी रोजी घेऊन गेला परंतु त्यांनी ती कार परत केली नाही. पवार यांनी त्याच्याकडे वेळोवेळी गाडीची मागणी केली असता तो आज देतो उद्या देतो, असे सांगून वेळ मारून नेत होता. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येत पोलिसाकडे धाव घेतली. शरद पवार यांनी कामती पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक गिरीष सरदेशपांडे , अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, कामती पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बबन माने यशवंत काठमळे अमोल अमोल नायकोडे भरत चौधरी यांच्या पथकाने तपास सुरु केला होता.
8 ट्रॅक्टर 14 जीप व परत 3 मोटरसायकली अशी 1 कोटी 20 लाख 50 हजार रुपय किमतीची 25 वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. आरोपीला अटक करून न्यायालायासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यास 4 दिवसाची पोलीस कोठाडी सुनावली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 चार वर्षात पंढरपुरातील वृंदावनातील संत चोखामेळा यांचे मंदिर पडले
• ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
पंढरपूर : येथील तुळशी वृंदावन येथे विविध संतांचे मंदिरे उभारण्यात आली होती. त्यापैकी संत चोखामेळा यांचे मंदिर अचानक पडले आहे. त्यामुळे संत चोखामेळा यांची मूर्ती देखील फुटली आहे. केवळ चार वर्षात बांधलेले मंदिर पडल्यामुळे तुळशी वृंदावनाचे काम निकृष्ट दर्जाचे झालेचे निष्पन्न झाले आहे.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून पंढरपुरात भव्य तुळशी वृंदावन बांधण्यात आले. भाविकांना तुळशीचे प्रकार आणि विविध संतांची मंदिरे, तैलचित्रे येथे रेखाटण्यात आली आहेत. 25 जानेवारी 2019 ला लोकार्पण करण्यात आले होते. मात्र केवळ चार वर्षात चोखामेळा यांचे मंदिर पडल्यामुळे संबंधित ठेकेदारांवर आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपाई आठवले गटाकडून करण्यात आली आहे.
तुळशी वृंदावनासाठी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे मंदिर पडले आहे. त्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
● ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची विधानपरिषदेत मागणी
चार वर्षापूर्वी बांधलेले संत चोखामेळा मंदिर पडल्यामुळे संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.