● सांगाडा पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवला, समाधी सुमारे 250 वर्षांपूर्वीची असावी
मोहोळ : पोखरापूर येथील मंदिर परिसरात सापडलेला समाधी अवस्थेतील सांगाडा व शिलालेख हे साधारणपणे सतराव्या शतकातील असावेत असा अंदाज व्यक्त करीत याबाबत प्रयोगशाळेमध्ये शास्त्रीय चिकित्सा झाल्यानंतरच अधिकृतपणे घोषणा करण्यात येईल, अशी माहिती पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक डॉ विलास वाहणे यांनी व्यक्त केला. Mohol Archeology department and research students carried out DNA testing of skeletons in grave state
पोखरापूर येथे पालखी मार्गाच्या कामावेळी एका समाधीचे पाडकाम केल्यानंतर त्या समाधीत एक ध्यानस्थ अवस्थेत आढळलेल्या मानवी सांगाडा पुरातत्त्व विभागाने शुक्रवारी बाहेर काढला. तो प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे पुरातत्व विभागाच्या वतीने सांगण्यात आले. त्याच्या अहवालानंतर सांगाडा कोणाचा हे स्पष्ट होईल.
पोखरापूर येथील जगदंबा मंदिराचे पुनर्स्थापन करीत असताना सापडलेल्या समाधी अवस्थेतील सांगाड्या चे आणि त्या परिसराचे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता. 10) दिवसभर उत्खनन सुरू होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सांगाड्याच्या शेजारी मातीचा माठ व शिलालेख ही आढळून आला याबाबत शुक्रवारी पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने पुण्यातील डेक्कन कॉलेजचे पुरातत्त्व विभागाचे नितीन जाधव व कॉलेजमधील पुरातत्त्व विभागाचे विद्यार्थी तसेच सतीष ढाकणे या चमूने शुक्रवारी दिवसभर या परिसरात संशोधनआणि उत्खनन केले.
यावेळी त्यांना सांगाड्याजवळ असणारी माती ओल्या स्वरूपात असल्याचे दिसून आले होते . त्यांनी सांगाड्याचे सर्व अवशेष व्यवस्थितपणे पॅकिंग करून बंदिस्त करून पुणे येथे प्रयोगशाळेमध्ये पाठवले. याबाबत बोलताना ते म्हणाले की निश्चितपणे आज सांगता येणार नाही परंतु या भागात मंदिर परिसरात वापरलेले दगड ,दीपमाळ यावरून साधारणपणे ही समाधी कधीची असावी याचा अंदाज लागू शकतो परंतु त्या सांगाड्याच्या अवशेषांची डीएनए चाचणी केल्यानंतरच निश्चितपणे कालावधी आपणास समजू शकेल तोपर्यंत याबाबत निश्चितपणे सांगता येणार नाही आणि अधिकृतपणे बोलता येणार नसल्याचे म्हटले.
समाधी ही अडीचशे वर्षांपूर्वीची असावी, असा अंदाज आहे. मानवी देह पुरताना त्या ठिकाणी मीठ टाकल्याची शक्यता असल्यामुळे हाडे तुटलेली नाहीत. माती आतापर्यंत ओलसर आहे. उत्खननात काढलेला मानवी सांगडा प्रयोगशाळेत पाठवणार असून, त्याचा अहवाल आल्यानंतर माहिती मिळेल, असे पुणे पुरातत्व विभागाचे सहायक आयुक्त विलास वहाने यांनी सांगितले.