सोलापूर : प्रेमविवाह केलेल्या तरुणाने राहत्या घरी पेटवून घेतले. ही घटना शहरातील आशा नगरात सात मार्च रोजी घडली. उपचारादरम्यान मंगळवारी (ता. 14) तरुणाचा मृत्यू झाला. A love-married young man set fire to the house, died in Solapur while under the influence of alcohol
एमआयडीसी परिसरातील आशा नगरात राहणाऱ्या राजकुमार सिताराम लिंबोळे ( वय २८ ) याने स्वतः अंगावर पेट्रोल ओतून पेटवून आत्महत्या केली. ७ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास त्याने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले होते. त्याला देविदास लिंबोळे (काका ) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान तो मंगळवारी सकाळी मरण पावला.
मयत राजकुमार हा रिक्षा चालक होता. मयताचा प्रेमविवाह झाला होता. कांही दिवसापूर्वी त्याची पत्नी घरातून निघून गेली होती. त्याच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असे परिवार आहे. दारूचा नशेत त्याने हा प्रकार केला . अशी नोंद एमआयडीसी पोलिसात झाली. सहाय्यक निरीक्षक चौधरी पुढील तपास करीत आहेत.
● अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणास पळवून नेऊन मारहाण
सोलापूर – तुझ्याकडे काम आहे, असे म्हणत एका तरुणाला दुचाकीवरून पळवून नेऊन काठी आणि लाथाबुक्याने मारहाण केली. ही घटना एमआयडीसी परिसरातील हॉटेल रसिक जवळ सोमवारी (ता. 13) सायंकाळच्या सुमारास घडली.
निलेश अंबादास आडकी (वय २७ . रा. जुना विडीघरकुल असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. निलेश आडकी हा सायंकाळी सागर चौकात थांबला होता. त्यावेळी शंकर गडगी , दत्तू गुंडला , श्रीकांत सोमा , आणि सागर माने या चौघांनी त्याला तुझ्याकडे काम आहे, असे म्हणत त्याला दुचाकीवर बसवून घेतले. त्यानंतर त्याला रसिक हॉटेल समोरील शेतात नेऊन गल्लीतील महिलेसोबत लफडे का करतो, असे म्हणत मारहाण केली, अशी नोंद एमआयडीसी पोलिसात झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● मारहाणीतील जखमीचा महिन्यानंतर मृत्यू
सोलापूर – भावकीतील प्रॉपर्टीच्या वादातून लाथाबुक्क्याने झालेल्या मारहाणीत जखमी झालेले जयवंत विजयकुमार गायकवाड (वय ४० रा.सेटलमेंट फ्री कॉलनी ) हे सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना मंगळवारी (ता. 14) पहाटे मरण पावले.
१३ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घरजागा आणि प्रॉपर्टी का मागतो ? म्हणून त्यांना नागनाथ दत्तू गायकवाड आणि अनिता नागनाथ गायकवाड या दोघांनी लाथा बुक्क्याने मारहाण केली होती. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान ते मंगळवारी मयत झाले, अशी नोंद सलगर वस्ती पोलिसात झाली आहे .
● अवैध व्यवसाय करणारे चौघे सराईत गुन्हेगार दोन वर्षासाठी तडीपार
सोलापूर : सलगरवस्ती पोलीस ठाणे हद्दीमध्ये बेकायदेशीर, विनापरवाना, हातभट्टी दारु तयार करुन विक्री व अवैध व्यवसाय करणारे सराईत गुन्हेगार रमेश रेखु राठोड, गुरुनाथ वालप्पा राठोड, दिलीप मधुकर चव्हाण व प्रकाश उमाजी राठोड (सर्व रा.मु.पो.भोजप्पा तांडा,कवठे गाव,ता.उ.सोलापूर जि.सोलापूर) यांच्याविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाणेस अनेक गुन्हे दाखल आहेत.
त्यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सर्व सामान्य जनतेच्या मनात दहशत निर्माण झालेली असल्याने व त्यांचे अवैध व्यवसाय चालु असल्याने सलगरवस्ती पोलीस ठाणे कडुन त्यांचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५७ अन्वये तडीपार प्रस्ताव पाठविण्यात आले होते.
या प्रस्तावाच्या चौकशीअंती पोलीस उपआयुक्त, (परिमंडळ) विजय कबाडे यांनी चारही गुन्हेगारांना सोलापूर व धाराशिव या जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशाची नमूद चारही गुन्हेगारांना बजावणी करण्यात आलेली आहे.
ही कारवाई सलगरवस्ती पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे,पोलीस उपनिरीक्षक सचिन मंद्रुपकर,पोह. चंगरपल्लु, पोकॉ.अविनाश डिगोळे, पोकॉ.बाबुराव क्षिरसागर यांनी केली आहे. यापुढे अवैध व्यवसाय करणारे व शांतता बिघडणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांची माहिती काढणे सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे.