कुर्डुवाडी : सीना नदी पात्रात वडिलांसोबत पोहायला गेलेल्या १८ वर्षीय किशोरवयीन मुलाचा पाण्यात दम छाटल्याने बडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी ( दि.१६ ) दुपारी ३ वाजता सुमारास लव्हे (ता.माढा) येथे घडली. २४ तासानंतर मृतदेह लव्हे ते शिराळा बंधाऱ्याच्यामध्ये मिळून आला. आदित्य विनायक पाटील असे पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. A young man who went swimming drowned, an unfortunate incident in Kurduwadi, Solapur
पत्रकार विनायक पाटील यांची लव्हे येथे शेती आहे. त्यामुळे त्यांचे मुलासह शेतात जा ये असते. काल गुरुवारी ते मुलगा आदित्यसह शेतात गेले होते. दु.३ वा.दरम्यान मुलगा व ते स्वतः नदीपात्रात पोहत असताना मुलाचा अचानक दम छाटल्याने पाण्यात गटांगळी खात तो बुडाला. जिवाच्या आकांताने वडिलांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला की गाळात कुठे अडकला समजले नाही.
याबाबत कुर्डुवाडी पोलिसांना माहिती मिळताच पो.नि. गोपाळ पवार व त्यांचे सहकारी घटनास्थळावर दाखल झाले. तसेच घटनास्थळाला तहसीलदार राजेश चव्हाण,गटविकास अधिकारी संताजी पाटील आदींनी भेट दिली. गावातील तरूणांच्या मदतीने पाण्यात शोध कार्य सुर झाले परंतू सायंकाळ पर्यंत आदित्य मिळून न आल्याने तो कुठे गाळात आडकला की पाण्याच्या प्रवाहात वाहात गेला हे समजणे कठीण झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शुक्रवारी सकाळी ८ वा. पुन्हा गावकरी आणि मच्छीमारांनी शोध मोहिम सुरु केली. अखेर दुपारी २ वाजता सुमारास लव्हेपासून सुमारे एक दीड कि.मी च्या अंतरावर लव्हे व शिराळा बंधाऱ्याच्या दरम्यान आदित्यचा मृतदेह आढळून आला.
कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक दत्ता सोमवाड,सोमनाथ गायकवाड, मच्छीमार व गावकरी यांच्या मदतीने मृतदेह पाण्यात बाहेर काढून ग्रामीण रुगणालयात शवविच्छेदन करुन हिंदू स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आदित्यच्या पश्चात आई, वडील, बहीण, आजोबा, आत्या असा परिवार आहे.
》 लग्नाचे आमिष दाखवून आणलेल्या विधवा महिलेस विष पाजले; हिरज येथील घटना
सोलापूर – लग्नाचे आमिष दाखवून पुणे येथील एका विधवा महिलेस सोलापुरात आणल्यानंतर तिला मारहाण करीत विष पाजल्याची घटना हिरज (ता.उत्तर सोलापूर ) येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. तिला बेशुद्ध अवस्थेत सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ती ३० वर्षीय महिला (पिंपरी चिंचवड जि.पुणे) येथे राहण्यास होती. तिच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर तिच्या परिचयातील सागर फंड (रा. हिरजगाव ता. उत्तर सोलापूर) याने तिला सहा महिन्यापूर्वी तुझ्याशी लग्न करतो असे म्हणत तिला आपल्या गावात आणले होते. त्यानंतर सायंकाळी सागर फंड आणि बापू भोसले या दोघांनी तिला मारहाण करीत बळजबरीने विष पाजले. तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती बेशुद्ध आहे. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 मोहोळ येथे मेहुण्यास पळवून चाकूने मारहाण
सोलापूर – घरगुती भांडणातून मेहुण्यास गोड बोलून दुसरीकडे नेऊन चाकू आणि लाथाबुक्क्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना चंद्रमौळी ता.मोहोळ) येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.
रेवणसिद्ध गोकुळ व्हनमाने (वय २६ रा. कुंभारखणी, मोहोळ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून नवनाथ (भाऊ) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले . रेवणसिद्ध व्हनमाने हा काल घरात बसला होता. त्याचा भाऊजी नितीन सोनटक्के (रा.नागनाथनगर मोहोळ) याने त्याला घरगुती भांडणातून गोड बोलत चंद्रमौळी येथे नेले . त्यानंतर नितीन व त्याच्या एक साथीदार असे दोघांनी त्याला चाकू आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
》 तृतीयपंथीयाशी अनैतिक संबंध; पत्नीने केला अडसर ठरणा-या पतीचा खून
सोलापूर : तृतीयपंथीयाशी अनैतिक संबंध त्यात पतीचा अडसर मग काय पत्नीने अडसर ठरणा-या पतीचा तृतीयपंथीयाच्या मदतीने खून केला. उलट पती हरवल्याची तक्रारही त्याच खून करणा-या पत्नीने पोलिसात दिली. वाचा सोलापुरात घडलेली घटना.
अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा तृतीयपंथीय मित्राच्या मदतीने खून करून रेल्वे मार्गावर टाकून दिल्याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिसांनी आरोपी पत्नी व तिच्या तृतीयपंथीय प्रियकराला अटक केली आहे.
मंगळवारी ( दि. ७ मार्च) रामबाग झोपडपट्टी परिसरात राहणारा वैभव हा सायंकाळच्या सुमारास अर्बन बँक चौकाकडे म्हणून गेला. त्यानंतर तो गायब झाला होता. ८ तारखेला वैभव मगर याच्या पत्नीने नवरा हरवल्याची तक्रार पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दिली.
त्यानुसार पोलिसांनी वैभव यांच्या मोबाइलचे कॉल रेकॉर्डिंग तपासले. दरम्यान, सांगोला तालुक्यातील मांजरी गावच्या हद्दीत रेल्वे रुळावर एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती पंढरपूर शहर पोलिस ठाण्याला मिळाली. त्यामुळे हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन आणि सांगोला तालुक्यात सापडलेल्या मृतदेहाचे वर्णन मिळतेजुळते असल्यामुळे पंढरपूर पोलिसांनी या संदर्भात सांगोला पोलिसांकडे अधिक चौकशी केली.
त्यानंतर पोलिसांनी मृताच्या पत्नीला ताब्यात घेतले. त्यावेळी मृताची पत्नी व तृतीयपंथी अक्षय रमेश जाधव यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. या अनैतिक संबंधांमध्ये वैभव मगर अडथळा ठरत असल्यामुळे त्या दोघांनी वैभव याला सांगोला रोडवरील दाते मंगल कार्यालय येथे ठार मारले व त्याचा मृतदेह खासगी वाहनातून मांजरी (ता. सांगोला) येथील रेल्वे रुळावर टाकून दिला. या खूनप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. तर खासगी वाहनाचा चालक अमोल खिलारे याचा पोलिस शोध घेत आहेत.