● पंतप्रधान मोदींनी शब्द पाळला, विकासाचा मार्ग मोकळा
सोलापूर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या मंदिराचे रूप पालटणार आहे. केंद्र सरकारने एक हजार कोटींचा विकास आराखडा तयार केला असून तिरूपती आणि शिर्डीच्या धर्तीवर तुळजापूरला येणाऱ्या भाविकांना साऱ्या सुविधा प्राप्त होणार आहेत. Shree Tuljabhavani temple will change form, donation of one thousand crores will fall under Tuljapur Narendra Modi’s word ऐतिहासिक वारसा असलेल्या तुळजापूर शहराच्या परिसरातील संपूर्ण भागाचा विकास केला जाणार असून या विकास आराखड्यातून धार्मिक पर्यटनाला मोठी चालना दिली जाणार आहे.
केवळ महाराष्ट्रच नव्हेतर तर अन्य राज्यांमधूनही श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी असंख्य भाविक दररोज येत असतात. लग्न सराईत तर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. ही गर्दी पाहाता सुलभ दर्शनाची म्हणावी तशी सोय नाही. इतर सोयींचाही अभाव आहे. त्याचा विचार करून केंद्र सरकारने प्रसाद या विशेष योजनेतून हा विकास आराखडा तयार केला आहे.
या आराखड्यात तुळजापुरात येणाऱ्या प्रत्येक प्रमुख मार्गावर शहराबाहेर म्हणजे नळदुर्ग रोड, हुडको, आराधवाडी भागात पार्किंग सुविधा असेल. सध्याच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येतील. त्याचठिकाणी भाविकांचे साहित्य ठेवण्याची सोय करण्यात येणार आहे. दर्शन अधिक सुलभ करण्यासाठी तसेच भाविकांच्या वेळेची बचत व्हावी, यासाठी शिर्डी, तिरूपती देवस्थानच्या धर्तीवर बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांचा वेळ वाचेल आणि गर्दीचेही नियंत्रण होईल.
नव्या योजनेमुळे दर्शनासाठी आपला नंबर कधी येणार हे भक्तांना आधीच कळणार आहे. त्यासाठी वाहन पार्किंग परिसरातच काऊंटर पास दिले जातील. त्यावरील वेळेनुसार तासभर आधी मंदिर आवारात भाविकांना प्रवेश मिळेल. दर्शन लाईन प्रकल्पातून टप्प्याटप्याने भाविकांना थेट मंदिरात सोडले जाणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● कसा असेल विकास आराखडा ?
नव्या आराखड्यात वातानुकुलित सभागृहातून दर्शनाची रांग असणार आहे. एकूण १० वातानुकुलित सभागृह आहेत. या सभागृहांची क्षमता ही एक लाख भाविक इतकी असेल. एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात पाठवून भाविकांना टप्प्याटप्प्याने मंदिरात सोडले जाईल. दर्शनाला किती वेळ लागेल हे आधीच कळणार आहे. वाहन पार्किंगच्या ठिकाणीच काऊंटर पास मिळेल. भाविकांना मंदिर परिसरात तासभर आधी प्रवेश मिळेल. मंदिर परिसरातील बांधकामात बदल होणार आहेत.
● छत्रपतींचेही दर्शन घडणार
तुळजापूर शहरालगत रामदरा परिसरात उद्यान साकारले जाणार आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येक प्रमुख मार्गावर आता दगडी कमानी उभारण्यात येतील. शासनाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता आल्यानंतर गरजेनुसार बदल केले जातील. यापूर्वी ३२५ कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबविण्यात आला होता. यातून तुळजापूर शहराचा पुरेसा विकास झाला नाही.
○ देर है, लेकिन अंधेर नही
महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजाभवानी मातेच्या शक्तीपीठाला विकासाची प्रतीक्षा आहे. अलीकडच्या काळात मंदिरात वाढलेली गर्दी आणि कमी पडत असलेल्या सुविधांच्या पार्श्वभूमीवर विकास आराखडा राबविण्याची गरज व्यक्त झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये तुळजापुरात झालेल्या प्रचारसभेत मंदिराच्या विकासाची ग्वाही दिली होती. त्यानंतर नऊ वर्षांनी यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या आहेत. भगवान की घर देर है, लेकिन अंधेर नाही, अशी एक म्हण आहे. मोदींनी शब्द दिला होता परंतु उशीरा का होईना त्याची पूर्तता केल्यामुळे भाविकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
○ काय आहे प्रसाद योजना ?
केंद्र सरकारची ही योजना पर्यटन विभाग राबवत असते. भारतातील धार्मिक पर्यटनाच्या विकासासाठी आणि प्रोत्साहनासाठी मार्ग प्रशस्त करणे आहे, हा या योजनेमागचा उद्देश आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत २०१४-२०१५ मध्ये तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक संवर्धन ड्राइव्ह योजना सुरू केली होती.
‘तीर्थक्षेत्र कायाकल्प आणि आध्यात्मिक संवर्धन ड्राइव्ह’ हे प्रसाद उपक्रमाचे पूर्ण नाव आहे. हा कार्यक्रम धार्मिक पर्यटन वाढविण्यासाठी भारतातील तीर्थक्षेत्रे तयार करणे आणि ओळखणे यावर लक्ष केंद्रित केले जाते. तीर्थक्षेत्रांना प्राधान्याने संघटित आणि शाश्वत पद्धतीने एकत्रित करून सर्वांगीण धार्मिक पर्यटन अनुभव देणे हे या योजनेचे ध्येय आहे.
》 महसूल प्रशासन | सोलापुरातील 14 जणांची नायब तहसीलदारपदी बढती
□ 11 अव्वल कारकून व तिघा मंडलाधिकार्यांचा समावेश
सोलापूर : पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अव्वल कारकून आणि मंडलाधिकार्यांना नायब तहसीलदारपदी बढती देण्यात आली असून यात सोलापुरातील 11 अव्वल कारकून आणि तिघा मंडलाधिकार्यांचा समावेश आहे.
बढती मिळालेले अव्वल कारकून पुढीलप्रमाणे. कंसात नियुक्तीचे ठिकाण. जयश्री चन्नप्पा पंचे-बीडकर (नायब तहसीलदार रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर), गजानन बेले (महसूल नायब तहसीलदार, सांगोला), सुधाकर बंडगर (निवडणूक नायब तहसीलदार, उत्तर सोलापूर), संतोष आढारी (निवडणूक नायब तहसीलदार, भूदरगड, कोल्हापूर), प्रवीण सूळ (नायब तहसीलदार, संगायो, इंदापूर, पुणे), प्रकाश सगर (नायब तहसीलदार, प्रांत कार्यालय, मंगळवेढा), सुभाष कांबळे (नायब तहसीलदार, प्रांत कार्यालय माण, सातारा), चंद्रकांत हेडगिरे (निवासी नायब तहसीलदार, मंगळवेढा), प्रकाश मुसळे (महसूल नायब तहसीलदार, शिरुर, पुणे), संजय भंडारे (महसूल नायब तहसीलदार, अक्कलकोट), सुबोध विध्वंस (निवडणूक नायब तहसीलदार, मोहोळ),
बढती मिळालेले मंडलाधिकारी पुढीलप्रमाणे. कंसात नियुक्तीचे ठिकाण
नानासाहेब कोळी (निवासी नायब तहसीलदार, जत, सांगली), बाबासाहेब गायकवाड, (निवडणूक नायब तहसीलदार, राधानगरी, कोल्हापूर), पांडुरंग भडकवाड, (महसूल नायब तहसीलदार, माढा).