सोलापूर : ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात उद्या शनिवारी (ता. 25 मार्च) सायंकाळी 5 वाजता टिळक चौक येथे भाजप आंदोलन करणार असल्याची घोषणा आमदार विजयकुमार देशमुख यांनी आज केली. Humiliation of OBCs; BJP’s agitation against Rahul Gandhi tomorrow in Solapur Vijay Kumar Deshmukh
मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचे भारतीय जनता पार्टी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे याबद्दल काहीच बोलत नसल्याबद्दल आमदार विजयकुमार देशमुख यांनी आश्चर्य व्यक्त केले.
विजय देशमुख यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ”मोदी ” या आडनावावरून अपमानास्पद टिप्पण्णी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला. न्यायालयाने या बद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेततून बाहेर पडले नाहीत असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याच्या ऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजपा न्यायालयात दाद मागेल, असेही ते म्हणाले.
सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते , असे वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केले होते. मोदी या आडनावाच्या अनेक व्यक्ती क्रीडापटू आहेत , डॉक्टर आहेत, इंजिनीअर आहेत, व्यावसायिक आहेत. एखाद्या आडनावाशी संबंधित लोकांचा एखादी व्यक्ती जाहीर सभेत अपमान करत असेल तर त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींना मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. आपण कोणालाही अपमानित करावे हा आपला अधिकार आहे, असे राहुल गांधींना वाटत असेल तर त्यांच्या वक्तव्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीला त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असेही आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
या पत्रकार परिषदेस आमदार विजयकुमार देशमुख, शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, ओबीसी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र काळे, शहर अध्यक्ष राम वाकसे, संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, युवा मोर्चा शहराध्यक्ष, गणेश साखरे आदी उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● खासदार संजय राऊत यांच्याकडून अनावधानाने झाली चूक; बार्शीत गुन्हा दाखल
सोलापूर : खासदार संजय राऊत यांच्याकडून सभागृहात बोलताना अनावधानाने झाली चूक झाली आणि त्यांच्याविरोधात बार्शीत पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला.
बार्शी अत्याचारातील पीडित मुलीचा फोटो सोशल मीडियात शेअर केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्यावर बार्शी पोलिस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रविवारी रात्री ११ वाजता एका सामाजिक कार्यकर्त्याने खासदार राऊत यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
बळेवाडी येथील एका अल्पवयीन मुलीवर आधी अत्याचार आणि त्यानंतर तिच्यावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करायला हवी होती. परंतु त्या प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केला. त्यामुळे दोन पोलिस अधिकारी आणि दोन पोलिस कर्मचारी यांना तातडीने निलंबित करण्यात आले. यानंतर आता ते दोन्ही आरोपी अटकेत आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर त्यातील दोन्ही संशयित हे. भाजप पुरस्कृत असल्याचे म्हटले. तसेच त्या पीडित मुलीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला फोटोही शेअर केला.
पीडित मुलीची ओळख पटेल, असे कृत्य केल्याने त्यांच्याविरोधात पॉक्सो कायद्याच्या कलम २३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.