सोलापूर – पंढरपूर तालुका परिसरात लांडग्याने धुमाकूळ घातला असून गेल्या १२ तासात लांडगा चावल्याने महिलेसह दोघेजण जखमी झाले . त्यांना पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. A wolf rampage in Pandharpur area; Two injured Mango Solapur
यापैकी पहिली घटना उजेवाडी (ता. पंढरपूर) येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली . सुमन रावसाहेब क्षीरसागर (वय ५४ ) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे . काल रात्री १० वाजेच्या सुमारास त्या गावातून पायी निघाल्या होत्या . त्यावेळी अचानक लांडग्याने त्यांच्यावर हल्ला करून नाकास चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या .
तर दुसरी घटना आंबे (ता. पंढरपूर ) येथे रविवारी सकाळच्या सुमारास घडली. दत्तू यशवंत खिल्लारे (वय ६२ रा . आंबे ) असे जखमी झालेल्या शेतमजुराचे नाव आहे. दत्तू खिल्लारे हे सकाळी ८ वाजता सुमारास शेतात काम करीत होते . यावेळी अचानक कोल्ह्याने त्यांच्यावर झडप टाकून चावा घेतला . त्यात त्यांच्या दोन्ही हाताच्या मनगटास जखम झाली. त्यांना अर्जुन सावंत (मालक ) यांनी सोलापुरात दाखल केले. या दोन्ही घटनांची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● पाथरी येथे नदीच्या पात्रात शेतकऱ्याचा मृत्यू
सोलापूर – नदीच्या काठावर असलेली पाण्याची मोटर काढत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने प्रल्हाद बाबू सुरवसे (वय ३० रा.पाथरी ता. उ. सोलापूर )हे पाण्यात बुडून मयत झाले.
ही दुर्घटना रविवारी (ता. 26) दुपारच्या सुमारास घडली . प्रल्हाद सुरवसे यांची सीना नदीकाठी शेती आहे . दुपारी एक वाजेच्या सुमारास विद्युत मोटारची पाईप उचलत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते पाण्यात बुडाले . त्यांना पाण्यातून काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वी मयत झाले .मयत प्रल्हाद सुरवसे हे विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे .या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
● लिंबीचिंचोळी येथे अपघात ;वृद्ध महिला ठार
लिंबीचिंचोळी (ता. अक्कलकोट ) येथील गावात अनोळखी वाहनाच्या धडकेने महेबुबबी अमिनोधीन कंडे (वय ६० रा . लिंबेचिंचोली ) ही महिला मयत झाली . आज रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. त्यांना अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करून त्वरित सोलापुरातील शासकीय रुग्णाला दाखल केले असता त्या दुपारी मयत झाल्या. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे .