मोहोळ : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या मोहोळ येथील सावली बंगल्यातून दीड लाखाचे प्लबिंगचे साहित्य चोरीस गेले याबाबत २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. NCP spokesperson Umesh Patil’s shadowy bungalow was stolen from Mohol Solapur याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ येथील कन्या प्रशाला चौकामधून जाणा-या जुन्या ढोकबाभुळगाव रस्त्याच्या लगत वेअर हाऊससमोर उमेश सुरेश पाटील यांचा सावली बंगला आहे.
या बंगल्याचे बांधकाम चालू आहे, त्याकरीता प्लंबींगचे सुमारे १ लाख ५० हजार रुपयाचे साहित्य आणून बांधकाम चालु असलेल्या बंगल्यात ठेवले होते. बंगल्याचे काम चालू असल्याने त्याला दरवाजे लावलेले नव्हते. दि.१५ डिसेंबर रोजी प्लंबर खांडेकर याच्याकडे कामाबाबत विचारले असता तो म्हणाला की, बॉक्समध्ये नविन आणुन ठेवलेले प्लबिंगचे सामान दिसुन येत नाही, असे सांगितल्याने सगळे बॉक्स उघडुन पाहिले असता सर्व बॉक्स रिकामे आढळुन आले.
यापूर्वी प्लॅबिगचे काम करणारे ओमप्रकाश राणाराम सुतार (रा. खारा ता-फलोदी जि. जोधपुर राज्य-राज्यस्थान) व प्रकाशचंद कनीराम सुतार ( कामगार दोघे रा. रा. जालोडा ता. फलोदी. जि.जोधपुर राज्य, राज्यस्थान) व त्यांचे साथीदार हे आम्हाला न विचारता गावाकडे निघुन गेले होते.
दरम्यान ते दि. २६ मार्च रोजी बंगल्यावर देखभालीचे काम करीत असताना वरील त्यांचे साथीदारापैकी ओमप्रकाश राणाराम सुतार, प्रकाशचंद कनीराम सुतार हे दोघे गावाकडून बंगल्यावर त्यांचे मशिनरी सुतार काम करण्याचे साहित्य घेवुन जाणेसाठी आले होते. आम्ही त्यांना सदर प्लबिंग साहित्याबाबत विचारपुस करता ते काही एक सांगत नाहीत यावरुन सदरचे प्लबिंगचे साहित्य वरील दोघे व त्यांचे साथीदार मालकाच्या सहमती वाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेल्याची फिर्याद उमेश पाटील यांचे खाजगी पी.ए प्रमोद आतकरे यांनी दिली आहे. अधिक तपास या घटनेचा पो. ना उपासे करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 बार्शी नजीक अपघातात एक जण जागीच ठार , ट्रक चालकावर गुन्हा
बार्शी : बार्शी- कुर्डूवाडी रस्त्यावर बार्शीपासून काही अंतरावर हॉटेल वैशालीजवळ आयशर ट्रक व दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. चंद्रकांत ज्ञानोबा गिराम (रा. गोपेगाव ता.पाथरी जि परभणी ) असे मयताचे नाव आहे.
चंद्रकांत गिराम हा बार्शीकडून कुर्डूवाडीच्या दिशेने दुचाकीवर (एम एच २० ए पी ८४५६) जात होता तर आयशर ट्रक (एम एच ०४ इ एल ३९९१ ) कुर्डूवाडीकडून बार्शीकडे येत होता. हॉटेल वैशाली जवळ या दोन वाहनांचा अपघात होऊन यात दुचाकीवरील चंद्रकांत गिराम हा जागीच ठार झाला. दुपारी ४.१५ वाजता ही घटना घडली.
ट्रक भरधाव वेगात चालवून दुचाकी वरील चंद्रकांत गिराम याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालक उत्तम गोविंद मसलकर (रा शिरापूर ता. मोहोळ जि. सोलापूर) याच्यावर बार्शी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संदीप बाळासाहेब गुंड (रा होळकर बागेजवळ, शिवाजी नगर बार्शी) याने फिर्याद दिली आहे.
● पंढरपुरात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले
पंढरपूर : शहरातील महाविद्यालयात शिकत असलेल्या १६ वर्षे १० महिने वयाच्या विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याची घटना गुरुवारी घडली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका महाविद्यालयात विद्यार्थिनीला परीक्षेसाठी तिची बहीण व भाऊ गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घेऊन गेले होते. तिला महाविद्यालयाच्या गेटवर सोडून दोघे घरी परतले. तिचे महाविद्यालय संपल्यानंतर ती नेहमी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरी परत येते, म्हणून त्यांनी तिची वाट पाहिली; परंतु ती घरी परत आलीच नाही.
त्यानंतर त्या मुलीच्या बहिणीने भावाला फोन करून सांगितले. त्यानंतर त्यांनी तिची महाविद्यालयात व शहर परिसरात तसेच तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली. तरी ती कोठेही मिळून आली नाही. त्यामुळे तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेली असल्याची तक्रार विद्यार्थिनीच्या बहिणीने दिली आहे.