○ भाजपचेच जास्त नुकसान होणार, केसीआर राव यांची शहरात सभा
सोलापूर : काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादूल हे काँग्रेसला रामराम ठोकून लवकरच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्रसमिती पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सादूल यांनी स्वतःच सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. सादूल यांच्या या निर्णयाने काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. Give shock to Solapuri Congress, ex-Kha. Dharmanna Sadul’s entry into BRS is sure politics BJP loss KCR Rao Sabha
मी मूळचा तेलंगणाचा आहे. याचा मला अभिमान आहे. भारत राष्ट्र समिती पक्षाचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव हे यापूर्वीही माझ्या संपर्कात होते. परंतु आपण सुरुवातीला त्यांना नकार दिला होता. अखेर दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि त्यांनी पक्षात येण्यासाठी पुन्हा आग्रह केला. यावेळी त्यांच्याशी सोलापूरसह महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. त्यानंतर आपण त्यांची विकासात्मक दृष्टी पाहून त्यांचे नेतृत्व मान्य केले असल्याचे माजी खासदार सादूल यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाकडून समजूत घातल्यास निर्णय मागे घेणार का? या प्रश्नाच्या उत्तरात सादूल यांनी आता अंतिम निर्णय घेतला आहे. त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. आज आपण काँग्रेस पक्षाकडे राजीनामा देणार आहोत, असेही सादूल यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस रघुरामलू कंदीकटला, गणेश पेनगोंडा, विक्रम पिस्के उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ १५ दिवसांत केसीआर यांची सोलापुरात सभा
लवकरच आपला जाहीर प्रवेश होणार आहे. आपल्या सोबत काँग्रेसचे उपाध्यक्ष अंबादास गुत्तीगोंडा येणार आहेत. त्यानंतर के. चंद्रशेखर राव यांची १५ दिवसात जाहीर सभा होणार आहे. त्यावेळी इतर प्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
● भाजपचेच जास्त नुकसान होणार
शहरात तेलुगू भाषिकांची संख्या सुमारे तीन लाख आहे. यातील बहुतांश तेलंगणातून आलेले आहेत. तेलुगू भाषिक समाजाच्या समस्या सोडविणे आणि सोलापूरचा विकास भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून करायचा आहे. या भूमिकेतून आपण पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्ष सोडताना दुःख होत आहे. माझ्या प्रवेशाने काँग्रेसपेक्षा भाजपचे नुकसान जास्त होणार आहे. कारण पूर्व भागात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आपल्या सोबत येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
○ पालिकेत किमान दहा नगरसेवक दिसतील
आपल्यावर के. चंद्रशेखर राव यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊ केली होती; मात्र आपण ती नाकारली आहे. पक्षासाठी, समाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. बीआरएस सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका लढवणार असल्याचे सांगत सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भारत राष्ट्र समितीच्या सुमारे दहा जागा निवडून येतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला.