मोहोळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांच्या गाडीला अपघात करणारा ड्रायव्हरच्या नावाचा दुसरा माणूस मोहोळ पोलीस ठाण्यात येऊन हजर झाला. त्यामुळे मोहोळ पोलिसांची आता डोकेदुखी वाढली आहे. Another person with the name of the accused appeared in the police station; Ramesh Baraskar accident case took a different turn Talathi bribe Solapur Mohol Mangalvedha
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर हे सोलापूरहून मोहोळकडे येत असताना सावळेश्वर टोळ नाक्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न झाला. त्या ट्रक डायव्हरला मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याने त्याचे नाव शांतलिंगेश्वर बाबूराव ढाले (रा. नांदगाव, ता. तुळजापूर) असे सांगितले होते व त्याच्यावर मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ही घटना २७ मार्च रोजी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास सावळेश्वर टोलनाक्या जवळ घडली होती.
इथपर्यंत सर्व ठीक होते. परंतु ही बातमी वाचून प्रत्यक्ष दुसरीच व्यक्ती मी शांतलिंगेश्वर बाबूराव ढाले आहे व माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे, म्हणून मोहोळ पोलीस ठाण्यात हजर झाली. माझ्यावरील खोटा गुन्हा माघारी घेण्यात यावा, अशा मागणीचा अर्ज मोहोळ पोलिसांकडे दिला. त्यामुळे आता रमेश बारसकर यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केलेला ‘तो’ शांतलिंगेश्वर ढाले कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रमेश बारसकर यांच्या म्हणण्यासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
जर तो शांतलिंगेश्वर ढाले नसेल तर त्याने तसे नाव का सांगितले? त्याने खोटे नाव का सांगितले? हा प्रश्न निर्माण झाला असून त्याचा नेमका उद्देश काय? बारसरकर यांना संपवण्याचा प्रकार होता की काय? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मोहोळ पोलीस काय भूमिका घेणार व कसा तपास करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सापळ्यात अडकल्याचे लक्षात येताच तलाठ्याने पैसे घेऊन ठोकली धूम
सोलापूर – सात हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर आपण लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या सापळ्यात अडकलो आहोत हे लक्षात आल्यावर तलाठ्यानं पैसे घेऊन चार चाकी वाहनातून धूम ठोकली.
मंगळवेढा प्रांत कार्यालयात हायवेच्या भूसंपादन मोबदला वाटपाचे काम पाहणाऱ्या तलाठी सुरज रंगनाथ नळे यांने ७ हजार रुपयांची लाच घेतली असून त्याने लाचेची रक्कम घेऊन घटनास्थळावरून फिल्मी स्टाईलने धूम ठोकली. खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण यास एसीबीने गजाआड केले आहे. याप्रकरणी तलाठी सुरज रंगनाथ नळे व खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण या दोघांविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
लाचलुचपत अधिकाऱ्यांना अखेर तलाठ्याचा साथीदार खाजगी व्यक्तीस ताब्यात घ्यावं लागलं. हा प्रकार काल सायंकाळी मंगळवेढा हद्दीत घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार आणि त्यांच्या मित्राच्या शेतीमधून राष्ट्रीय महामार्ग सांगली – सोलापूर जात आहे. यात शेत जमिनीमध्ये असलेली पाईपलाईन बाधित होत आहे. याचे नुकसान १ लाख ४४ हजार रुपये मंजूर झाले आहे पण मंजुरी दाखला देण्यासाठी तलाठ्यानं मध्यस्ताच्या माध्यमातून सात हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारत असताना तलाठ्याला आपण सापळ्यात अडकलो आहोत हे लक्षात आलं. तेव्हा त्यानं ७००० ची रक्कम घेऊन स्वतःच्या चार चाकी गाडीतून तातडीने पोबारा केला.
लाचलुचपत अधिकाऱ्यांनी तलाठी सुरज रंगनाथ नळे उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा यांच्या कार्यालय आणि घराजवळ सापळा लावला. मात्र सुरज नळे हे संबंधितांना पाहून तेथून वेगाने निघून गेले. लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण याला त्याच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं आहे. उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने हा सापळा लावला होता. तलाठ्याचा शोध सुरू आहे.