संभाजीनगर : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपा पक्षासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री मागितली म्हणून दंड ठोठावला. म्हणजे आम्ही आमच्या पंतप्रधानांची डिग्रीही पाहू शकत नाही ही शोकांतिका आहे, ‘ असे ठाकरे यासभेत बोलताना म्हणाले. न्यायव्यवस्था भाजपा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले. Uddhav Thackeray criticizes PM; Vajramooth meeting of Mahavikas Aghadi is the stake of many factions! Sambhajinagar Ajit Pawar
छत्रपती संभाजीनगर येथे आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. या सभेची जय्यत तयारी झाली असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सभेसाठी मातोश्रीवरून निघाले होते. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ऐन वेळी सभेला दांडी मारली आहे. नाना हे आजारी असल्याच्या कारणाने सभेला उपस्थित राहु शकले नाहीत. मात्र, ऐनवेळी त्यांच्या अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
वज्रमूठ सभेच्या आयोजनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सहभागी असले तरी सभेच्या यशस्वितेसाठी उद्धव ठाकरे गटाकडून अधिक प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सभेच्या ठिकाणी स्तंभपूजन, सभेचे निमंत्रण, कामाची पाहणी, सोशल मीडियावर कॅम्पेनिंग या सर्व गोष्टींत उद्धव ठाकरे गटाने पुढाकार घेतल्याचं दिसून आलं.
छत्रपती संभाजीनगरच्या वज्रमूठ सभेला सुरूवात होताच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या विदेशातील लोकशाहीवरील वक्तव्याची पाठराखण केली. तसेच सध्या राज्यभर गाजत असलेला अदानींच्या खात्यात ते 20 हजार कोटी आले कुठून असा प्रश्न विचारला. येत्या लोकसभेला मविआचे 38 खासदार निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील मविआच्या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदेगटासह भाजपावर जोरदार प्रहार केला. या सभेत त्यांनी आगामी निवडणुकीत भाजपाविरोधात वज्रमुठीने एकत्र लढण्याचा निर्धार केला. तसेच हिंदुत्वाबाबत सांगताना त्यांनी आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नसून आतंकवाद्यांना तुडवणाऱ्यांचे असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. यावेळी लोकशाहीचे रक्षण करणार असल्याचे देखील ठाकरे म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआच्या वज्रमुठ सभेला सुरुवात झाली. शहराचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सभेला संबोधित करताना शिंदेगट आणि भाजपवर जोरदार हल्ला केला. सावरकरांना भारतरत्न देत नाहीत आणि यात्रा काय काढतात असे खैरे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी शरद पवार आणी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मदत केल्याचे सांगितले.
शिवसेना-भाजपने काढलेली ‘सावरकर गौरव यात्रा’ ही अदानी बचाव यात्रा असल्याची टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुष्मा अंधारे यांनी केली आहे. तसेच “भाजपला सावरकरांबद्दल आस्था आहे तर त्यांचे जन्मस्थळ असलेल्या भगूर गावची दुरावस्था का झाली. त्या ठिकाणी मोठे स्मारक का नाही झाले? भाजपला खरंच सावरकरांबद्दल प्रेम असेल तर त्यांनी गुजरातच्या अहमदाबादचे नाव सावरकरनगर करुन दाखवावं” असे देखील अंधारे म्हणाल्या आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ वज्रमूठ सभेतून अजित पवार…..
-उद्धव ठाकरे यांनी आणलेले उद्योग हे या नव्या सरकारच्या
पायगुणाने उद्योग राज्याबाहेर गेले, अशी टिका केली आहे.
-आपल्याला आपली वज्रमूठ टिकवायची आहे.
-जनाची नाहीतर मनाची लाज वाटू द्या.
— सर्वधर्म समभाव जपनारा मराठवाडा आहे.
– हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा.
○ वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरे…..
– तुम्ही म्हणता आम्ही सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे तळवे चाटत होतो. तर तुम्ही मिंधेंचे काय चाटताय ?
– होय आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो, पण सत्ता गेल्यानंतर देखील आम्ही एकत्र
– चांगली चाललेली सरकार पाडणे हे यांचे धोरण
– पक्षाचे नाव बदलून भ्रष्टाचार पार्टी ठेवा
– मेघालयमध्ये तुम्ही संगमांचे काय चाटले
– दिसला भ्रष्ट की घेतला पक्षात
– विरोधकांच्या मागे ईडी लावली जातेय.
– माझा बाप चोरण्याचा प्रयत्न, स्वत:च्या वडिलांना किती दुःख होत असेल.
– एक कांदा 50 कोटींना विकला गेला
– कागदावर लिहून आणलेले अडखळत का होईना वाचतात
– आमच्या हिंदुत्वाची मोजमापे घेणारे तुम्ही कोण?
• देशमुखांच्या नातीची चौकशी करता –
— अनिल देशमुखांना उगाच कोंडून ठेवता
– राजेश टोपेंनी आरोग्य खात उत्तम सांभाळले
– भाड्याने आणलेली माणसे ही शेवटपर्यंत बसत नाही
– सुप्रिया ताईंना घाणेरड्या शब्दात बोलणं हे तुमचे हिंदुत्व
– अंधारे ताईबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांच्या तोंडातून हिंदुत्व शब्द शोभत नाही
– तुमच्या हातात भगवा झेंडा शोभत नाही
– भाजप आम्ही नामशेष केल्याशिवाय राहणार नाही
– मिंध्यांचे ओझे घेऊन निवडणुका लढणार का?
– आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही
– काही प्रश्नाचे उत्तर देता येत नाही
– आम्ही फसवाफसवी केली नाही