अक्कलकोट/सोलापूर : जिल्ह्यातील २५ कारखान्यांकडे उस बिलाची ५७७ काेटी रुपये एफआरपी थकीत आहे.या कारखान्यांवर महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) नुसार कारवाई करणे आवश्यक असल्याचे पत्र प्रादेशिक सहसंचालक (साखर) राजेंद्रकुमार दराडे यांनी बुधवारी साखर आयुक्तांना पाठविले. गेल्या चार महिन्यात पाठविलेले हे चाैथे पत्र आहे. एकाही पत्रावर कार्यवाही झाली नसल्याचे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले. 577 crore FRP due to sugar mills in Solapur, protesting farmers of Ryat Kranti Sangathan
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याला ऊस घातलेल्या सर्व शेतकऱ्यांना उर्वरित एफआर पी प्रमाणे ५७७ कोटी रुपये ते उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना लवकर मिळण्यासाठी आज बुधवारी (५ एप्रिल) प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर विभाग सोलापूर येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन केले.
रयत क्रांती संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिपक भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. सन २०२२/२३ ह्या हगांमात गाळपास आलेल्या ऊसाची पहिली उचल सोलापूर जिल्ह्यातील काही कारखान्याने डिसेंबर,जानेवारी ते कारखाने बंद झाले पासून दिलेली नाही. या अगोदर देखील रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा यांच्या वतीने १३ मार्च रोजी रयत क्रांती संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक सहसंचालक (साखर) विभाग सोलापूर येथे आंदोलनासाठी निवेदन दिले होते.
तेव्हा चार एप्रिल पर्यंत पहिली उचल जमा नाही केली तर आपल्या कार्यालय समोर आंदोलन करू, असे निवेदन दिल्यानंतर पंधरा दिवसांत सोलापूर जिल्ह्यातील कारखानदाराने हजारो कोटी रूपये ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर जमा केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सोलापूर जिल्ह्यातील 22/23 साठी आलेल्या ऊसाची एकूण एफआरपीची एकूण रक्कम ४०९० कोटी रुपये आणि त्यात दिलेली एकूण रक्कम ३५१२ कोटी रुपये उर्वरित एफआर पी प्रमाणे ५७८ कोटी रुपये राहिलेली आहे, ते उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना लवकर मिळण्यासाठी रयत क्रांती संघटनेने आज उपप्रादेशिक सहसंचालक (साखर) विभाग सोलापूर येथे आंदोलन केले.
संबंधित अधिका-यांना लेखी निवेदन देण्यात आले. आजच्या या रयत क्रांतीचे 25 कारखान्यावर सुध्दा आंदोलनाने आरआरसी दाखल करण्यात येणार आहे, असे आश्वासन सहसंचालक पांडुरंग साठे यांनी लेखी दिले आहे. त्यामुळे तात्पुरती ही आंदोलन मागे घेण्यात आली आहे. रयत क्रांती संघटनेच्या आंदोलनाने सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे, अशी माहिती रयत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य चे कार्याध्यक्ष दिपक भोसले यांनी दिली.
यावेळी हणमंत गिरी,समाधान फाटे,छगन पवार,नामदेव पवार,तनुजा जवळे ,बाळासाहेब बोबडे,लक्ष्मण बिराजदार, नागेश नाईकवाडे, रमेश भंगे,राजकूमार बिराजदार, सुनिता चव्हाण, प्रियांका दोड्याळे, वैष्णवी लोहार,श्रीदेवी रेड्डी,रेणूका लोहार यांच्या सह रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.