• राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेस आणि सीपीआयचाही काढला दर्जा
मुंबई : राष्ट्रीय राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने सोमवारी रद्द केला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मात्र राष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. NCP’s national status revoked; We got national status Aam Aadmi Party Arvind Kejriwal Sharad Pawar Broom Clock Election Commission
सन २०१४ नंतरच्या विविध निवडणुकांमधील पक्षाची कामगिरी विचारात घेऊन निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादीसोबतच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे हे पक्ष आता प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत. याचवेळी कमी कालावधीमध्ये खूप मोठी राजकीय झेप घेणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मात्र राष्ट्रीय दर्जा मिळाला आहे.
काँग्रेस पक्षात बंड करून १९९९ साली पक्षाला दर्जा शरद पवार बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. दि. १० जानेवारी २००० रोजी राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाची मान्यता निवडणूक आयोगाने दिली होती. सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हा दर्जा कायम राहिला. त्यानंतरच्या विविध निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची घसरण झाल्यामुळे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला नोटिसा काढल्या होत्या. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा काढताना लोकसभा २०१९ चे नियम लक्षात घेतले आहेत. त्यानंतर ज्या ज्या राज्यात निवडणुका झाल्या आहेत.
तेथील आकडेवारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. अरुणाचलप्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय आणि नागालँड या राज्यातील राष्ट्रवादीचे अस्तित्व कमी झालेले आहे. राष्ट्रवादी पक्षासह तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.
Delhi | Aam Aadmi Party (AAP) National Convener and CM Arvind Kejriwal to address party workers today as ECI grants national party status to AAP pic.twitter.com/CfBUvGpbIn
— ANI (@ANI) April 11, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
Aam Aadmi Party (AAP) is recognized as a national party. The status of NCP, CPI and AITC as a national political party has been withdrawn. NCP and AITC will be recognized as state parties in Nagaland and Meghalaya respectively: Election Commission of India pic.twitter.com/o6SDuhDFdg
— ANI (@ANI) April 10, 2023
○ सुनील तटकरे काय म्हणाले ?
१५ दिवसांपूर्वी आम्ही आमचे म्हणणे निवडणूक आयोगासमोर मांडले होते. १९९९ पासून आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. त्यानंतरच्या सर्व लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकवण्यासाठी जी काही मतांची बेरीज संबंध देशभरात मिळवावी लागते, ती टक्केवारी आम्हाला मिळाली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने आम्हाला स्पष्टीकरण मागितले होते. ते आम्ही दिले. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा तपशील घेऊन. जी काही कायदेशीर पावले उचलायची ती उचलण्यात आल्याचे खासदार सुनील तटकरे (राष्ट्रवादीचे नेते) यांनी सांगितले.
○ राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता केव्हा मिळते ?
१. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला ४ किंवा जास्त राज्यांमध्ये वैध मतांपैकी कमीत कमी ६टक्के मते मिळाली पाहिजेत आणि लोकसभा निवडणुकीत कमीत कमी ४ जागा मिळाल्या पाहिजेत. किंवा
२. लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी रटक्के जागा मिळाल्या पाहिजेत आणि या जागा कमीत कमी ३ राज्यांमधून निवडून आल्या पाहिजेत. किंवा
३. त्या पक्षाला कमीत कमी ४ राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे.
○ प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता केव्हा मिळते ?
१. विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी ६ टक्के मते आणि एकूण जागांपैकी कमीत कमी २ जागा मिळाल्या पाहिजेत. किंवा
२. लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी ६ टक्के मते आणि एकूण जागांपैकी कमीत कमी १ जागा मिळाली पाहिजे.
३. विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी ३ टक्के जागा किंवा कमीत कमी ३ जागा मिळाल्या पाहिजेत.
४. लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला राज्यातील २५ जागांमागे १ जागा मिळाली पाहिजे.
५. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी ८ टक्के मते मिळाली पाहिजेत.
○ पक्षाला राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्याचे फायदे
१) राखीव निवडणूक चिन्ह
२) पक्षाच्या कार्यालयासाठी अनुदानित दरामध्ये जमीन
३) दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर मोफत प्रक्षेपण
४) निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्यांचे मोफत वितरण
आम आदमी पार्टी को राष्ट्रीय पार्टी बनने पर सभी मेहनती कार्यकर्ता को बधाई एवं शुभकामनाएं!@AapKaGopalRai @ArvindKejriwal#AamAadmiParty #arvindkejriwalofficial #NationalPartyAAP pic.twitter.com/icnLdjLIS5
— Brijesh kushwah (@Brijeshkushvah) April 11, 2023