सोलापूर : आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता भाजप मोठ्या प्रमाणात आंबेडकर जयंती साजरी करणार आहे. BJP Dr. Ambedkar Jayanti will be celebrated; Solapur election is an attempt to attract the votes of the backward classes त्यासाठी सोलापूर भाजप अनुसूचित जाती आघाडीला मैदानात उतरवले आहे. या नव्या प्रयोगामुळे मागासवर्गीय मतांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसून येत आहे.
महापालिका निवडणूक असो वा लोकसभा निवडणूक असो भाजप प्रत्येक निवडणूक व्यूहरचना करून लढतो, हे आतापर्यंत सिद्ध झाले आहे. आताही भाजपकडून तसेच नियोजन करण्यात येत आहे. प्रदेश भाजपाने संपूर्ण राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सोलापूरसह सर्व जिल्ह्यात भाजपकडून न्याय सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
सोलापूर शहरात आगामी काळात महापालिका निवडणूक, लोकसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूक समोर ठेवून भाजपने आता मागासवर्गीय मतांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भाजप अनुसूचित जातीतर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांना त्यासाठी मैदानात उतरवले आहे. त्यांचे डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित केले आहे.
भाजपकडून अनुसूचित जाती घटकांची मोर्चेबांधणी या निमित्ताने केले जात असल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंत काँग्रेसकडून मागासवर्गीय मतांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. तीच मते काँग्रेससाठी निर्णायक ठरत होते. दरम्यान २०१९ रोजी सोलापूर शहरांमध्ये वंचित आघाडीचा प्रवेश झाला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
खुद्द वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत एन्ट्री केली. त्यामुळे मागासवर्गीय मतांचे ध्रुवीकरण झाले. सुमारे पावणे दोन लाख मते प्रकाश आंबेडकर यांना मिळाली. दलित वर्ग मोठ्या प्रमाणात वंचितकडे वळाल्याचे या निवडणुकीत दिसून आले. प्रकाश आंबेडकर जर निवडणूक रिंगणात नसले असते तर कदाचित भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई झाली असती असे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही शहर उत्तर मधून आनंद चंदनशिवे यांना वंचित आघाडीतर्फे २५ हजारांपेक्षा जास्त मते मिळाली होती. मात्र आनंद चंदनशिवे त्यानंतर आनंद यांनी वंचित आघाडीला रामराम केला. तेव्हापासून शहरात वंचित आघाडीचा प्रभाव थोडा कमी झाला आहे. आता याचाच फायदा घेण्यासाठी भाजप सरसावली आहे. त्यामुळेच आता भाजप अनुसूचित जातीतर्फे आंबेडकर प्रेमींसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथमच भाजपकडून या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. भाजपचा हा कार्यक्रम म्हणजे मागासवर्गीय मतांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयोग असल्याचे बोलले जात आहे.
○ इच्छुकांना आणले फोकसमध्ये
भाजप अनुसुचित जातीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनाही फोकस केल्याचे दिसून आले.